नांदगाव येथे ठाकरे गटाला खिंडार असंख्य कार्यकर्त्यांचा आ.कांदेंच्या उपस्थितीत शिंदे सेनेत जाहीर प्रवेश

 Bay -team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

 नांदगाव येथे शिवसेना पक्षाच्या वतीने दुचाकी मॅकेनीकल, गॅरेज मालक तसेच रिक्षा युनियन, चालक, मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा भव्य मेळावा पार पडला.याप्रसंगी मेळाव्यात शिवसेनेचे जेष्ठ नेते व नांदगावचे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या नेतृत्वाखाली संख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

संपूर्ण नांदगाव शहरातील वाहन क्षेत्राशी संबंधित प्रमुख व्यक्ती व संघटनांचे पदाधिकारी शिवसेनेच्या छत्राखाली आले. या ऐतिहासिक मेळाव्यामुळे शिवसेना शिंदे गटाची ताकद नांदगाव शहरात अधिकाधिक वाढली आहे. जो उबाठा नांदगाव शहर प्रमुख म्हणून ओळख असलेले चेतन शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. चेतन शिंदे यांनी आपल्या भाषणात आ. सुहास आण्णा कांदे यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव शहरात झालेल्या विकास कामांचे भरभरून कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “सुहास आण्णा यांच्या विकासाच्या गतीने प्रेरित होऊन आम्ही शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यांच्यासोबत शाम शिंदे, रवी लोखंडे, नूरा खान, मनोज निकम, योगेश साळुंखे, गणेश शिंदे, दिलीप इघे, उमेश शिंदे,अरबाज खान, वैभव शिदीकर, संजय गोरे, मुजम्मिल बेग, आसिफ पिंजारी, पप्पू थोरात, राजू शिंदे, साहेबराव बनसोडे, अनिल मावरे, नाना अडकमोल, विकास लोखंडे यांनीदेखील पक्षप्रवेश केला.या प्रवेशामुळे नांदगाव मधील आणखी मजबूत झाली आहे.

प्रवेशामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे आणि शिवसेना शिंदे गटाचे नांदगाव येथे आ.कांदे यांचे हात    अधिक बळकट झाले आहे. यावेळी सौ.अंजुमताई कांदे, फरहान खान, प्रमोद भाबड, सागर हिरे,सुनील जाधव, रोहिणी मोरे, शशी सोनावणे, अय्याज शेख, प्रकाश शिंदे, बापू जाधव, नितीन सोनावणे,संजय आहेर,राजेंद्र देशमुख, राजेंद्र पवार,अंकुश कातकडे आदीसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments