कासलीवाल विद्यालयातील चिमुकल्यांनी अनुभवली शिवसृष्टी

 Bay -team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

 सौ.कमलाबाई माणिकचंद कासलीवाल प्राथमिक विद्यालयात दिनांक १४ शनिवार रोजी आशिया खंडातील सर्वात मोठी शिवसृष्टी नांदगाव येथे विद्यार्थ्यांना क्षेत्र भेट उपक्रमाअंतर्गत  शिवसृष्टीला प्रत्यक्ष भेट देण्यात आली.

यावेळी संपूर्ण शिवकालीन परिसर विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन चरित्र सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी देखील शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक जीवनपट समजावून घेतला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, अशा घोषणा देऊन संपूर्ण शिवसृष्टी परिसर दुमदुमून टाकला. त्यामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा शिवकालीन गीते त्यांनी सादर केली तसेच श्री व्हि.पी.सावंत यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनावर थोडक्यात विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. तसेच आपला ऐतिहासिक वारसा जपणे गरजेचे आहे हे प्रत्यक्ष क्षेत्र भेटीने पटवून दिले.शाळेने राबवलेल्या या कार्यक्रमाचे संस्थेचे चेअरमन मा.श्री सुनील कुमार कासलीवाल, उपाध्यक्ष सुशील कासलीवाल,सचिव विजय चोपडा, प्रशासक प्रकाश गुप्ता, सहसचिव प्रमिला कासलीवाल, विश्वस्त रिखबचंद कासलीवाल, जुगलकिशोर अग्रवाल, महेंद्र चांदिवाल, आनंद कासलीवाल, मुख्याध्यापक व्ही.पी. सावंत यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. हा उपक्रम यशस्वीतेसाठी श्री. सिद्धार्थ जगताप, अभिजीत थोरात,तुषार जेजूरकर, श्रीमती वैशाली शिंदे, जयश्री पाटील, निशिगंधा शेंडगे, जयश्री कुमावत, अर्चना बोरसे, पुनम खोंडे, शालिनी निकम, निकिता देशमुख, स्नेहल आढाव, यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments