येवला येथील शिवसृष्टी प्रकल्पाच्या अंतिम टप्प्याची मंत्री भुजबळांनी केली पाहाणी

 Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

येवला शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्र्यावर आधारित भव्य शिवसृष्टी प्रकल्प साकारण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण दि.२६ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात येणार आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज या प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या कामाची पाहणी केली.

यावेळी त्यांनी विविध सुचना देखील केल्या या प्रसंगी  विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, सिंचन सेलचे अध्यक्ष मोहन शेलार, निसार शेख, दीपक गायकवाड, भाऊसाहेब धनवटे, गोटु मांजरे, सुमित थोरात, गणेश गवळी, प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, आर्किटेक्ट सारंग पाटील यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments