नांदगाव येथे येत्या २६ तारखेपासून ते २ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या नियोजित शिव महापुराण कथेच्या कार्यक्रम स्थळाची आ. सुहास अण्णा कांदे यांनी सपत्नीक पाहणी करून विधिवत भुमी पुजा केले.यावेळी मंडप पूजन, आणि ध्वजारोहण आमदार सुहास कांदे व सौ. अंजुम ताई कांदे यांचे हस्ते मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाले.
नांदगाव मतदार संघातील शिव भक्तांसाठी आ. कांदे व सौ. अंजुम ताईंच्या सहकार्याने सिहोर (मध्यप्रदेश ) येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिव कथाकार परमपूज्य पं.प्रदीप मिश्रा यांचा सात दिवसीय प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. आज या कार्यक्रमाच्या नियोजित स्थळी मनमाड - नांदगाव मार्गांवर हिसवळ जवळ भूमिपूजन, मंडप पूजन, आणि ध्वजारोहण आमदार कांदे पती -पत्नीच्या हस्ते व शेकडो भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आले. या पूजनाचे पौरोहित्य प्रसाद कुलकर्णी, योगेश कुलकर्णी, शुभम जोशी, राहुल कुलकर्णी यांनी केले.
फरहान खान,ज्ञानेश्वर कांदे, किरण कांदे, धनंजय कांदे,कु. देवा कांदे, प्रमोद भाबड, दिपक मोरे, विष्णू निकम, सुधीर देशमुख, राजेंद्र देशमुख, जीवन गरुड,यज्ञेश कलंत्री, आनंद चांडक,शशी सोनावणे, राजाभाऊ भाबड, सुनील जाधव, शुभम आव्हाड, रोहिणी मोरे, अँड.विद्या कसबे, योगिता बच्छाव, माया शेळके, भारती बागोरे, निशा चव्हाण, नेहा कोळगे, सुनील जाधव, संतोष कांदे, डॉ. प्रभाकर पवार, भरत पारख, राजू परदेशी आदी सह शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी च्या पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments