मविप्र समाज संस्थेचे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जातेगाव येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा

 Bay -team aavaj marathi 

भरत पाटील पत्रकार जातेगाव नांदगाव (नाशिक)

 हिंदी दिवस कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री पि.के.धुळे हे होते, कार्यक्रम प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थीनी सायली कासार हिने सुत्र संचालन केले. तसेच साक्षी कदम, मोनिका पवार,किर्ती काटे, सिध्दिका गायकवाड भुषण पवार या विद्यार्थ्यांनी हिंदी भाषाचे महत्त्व देशात हिंदी भाषेचे स्थान व गरज या विषयावर मनोगत व्यक्त केले.

 त्याच बरोबर विद्यालयातील सहावी,सातवी च्या विद्यार्थ्यांनी नाटिका व गीत सादर केले.विद्यालयाच्या हिंदी विषयाच्या शिक्षीका श्रीम. हिरे मॅडम यांनी हिंदी भाषेचा उगम या विषयी मार्गदर्शन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पि. के. धुळे सर यांनी जागतिक स्तरावर हिंदी भाषेचे स्थान या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रम प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments