साकोरा येथे शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व शिक्षक सोनवणे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान

 Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे गणित आणि विज्ञान विषयाचे शिक्षक श्री सोनवणे एम. पी. यांना World Humanity Commission (USA ) या संघटनेमार्फत राष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल गुरुवार दि.१९ रोजी संस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन प्रसंगी संस्थेच्या मान्यवर पदाधिकार्यांच्या हस्ते शिक्षक श्री सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. 

संस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन माजी खा. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा.श्री राम शेठजी ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड.श्री भगीरथजी शिंदे हे होते तर उत्तर विभागीय कार्यालय विभागीय अधिकारी मा.बोडखे साहेब, सहाय्यक विभागीय अधिकारी तोरणे साहेब, वडजे बापू, जिल्हा परिषद सदस्य व स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष मा श्री .रमेश उग्रसेन बोरसे ,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सतीष भाऊ बोरसे, यांची प्रमुख उपस्थिती होती. वरील कार्यक्रम यशस्वी करण्या- साठी विद्यालयाच्या प्राचार्या सौ. जगताप मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी,पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 



 


Post a Comment

0 Comments