जरांगे पा. यांना पाठिंबा देण्यासाठी तरुणाने उघड्या अंगावर स्वताला चाबकाचे फटके मारुन घेत केला शासनाचा निषेध

 Bay -team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

मनोज दादा जरांगे पाटील यांच्या गेल्या कित्येक महिन्यांपासून लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यात नांदगांव येथील मराठा योध्दा विशाल पा वडगुले यांनी रविवार दि. २२ रोजी याच समर्थनार्थ मोर्चाचे आयोजीत करण्यात आलेल्या मोर्चात पुढच्या बाजूला चालत जाऊन शासनाच्या निषेधार्थ अर्धनग्न होत, उघड्या अंगावर स्वताला चाबकाचे फटके मारून घेत जन अक्रोश आणि आत्मक्लेश मोर्चात सामील झाला.

संपुर्ण राज्यात सध्या मराठा आरक्षण या विषयावर ठिक ठिकाणी आंदोलन, उपोषन सुरु या दरम्यान मनोज जरांगे, पाटील यांना पाठिंबा दर्शवित उपोषण सुरु आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना पाठींबा देण्यासाठी येथे सुरू असलेल्या आंदोलनात  देण्यासाठी येथील विशाल वडगुले,भास्कर झा्ल्टे, विष्णु चव्हाण, प्रकाश जगताप, भीमराज लोखंडे, निवृत्ती खालकर हे अमरण उपोषणाला बसले आहे.

या मोर्चात तालुक्यातील ग्रामीण भागातील व नांदगांव आणि मनमाड शहरातील हजारो सकल मराठा समाज कार्यकर्ते सामील झाले होते. हा आक्रोश मोर्चा येथील मुख्य नांदगांव पोलिस स्टेशन समोरुन निघून शहरातील प्रमुख चौकातून मुख्य बाजार पेठेतून उपोषणस्थळी आल्या नंतर मोर्चाची सांगता झाली. आजच्या आक्रोश आत्मक्लेश मोर्चात तालुक्यातील माजी आमदार, जिल्हा परिषदचे आणि पंचायत समितीचे सदस्य ग्रामीण भागातील प्रमुख मराठा समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते.समाजाला आरक्षण मिळावे यासाठी काही मुख्य मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.
 







Post a Comment

0 Comments