मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी नांदगांव येथे सात दिवसांपासून साखळी उपोषण सुरु आहे. परंतु शासन स्तरावर अद्याप कोणताच निर्णय झालेला नसल्याने नाही, सरकारने समाजाच्या मागण्या मान्य केल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही. असा निर्धार करीत मराठा समाज बांधवांनी करत आपले उपोषण सुरू ठेवले आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वतीने मराठा समाजा तील विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण मिळावे, ज्यामुळे उच्च शिक्षण सुलभता होईल,सरकारी आणि निमसरकारी नोकऱ्यां- मध्ये मराठा समाजातील तरुणांना आरक्षण दिले जावे, समाजाचा इतर मागासवर्ग (OBC) मध्ये समावेश करण्यात यावा, मराठा समाजाच्या आर्थिक परिस्थितीच्या सुधारणेसाठी शेतकरी बांधवांना आर्थ साहाय्य आणि कर्जमाफी सारख्या योजना लागू कराव्यात, उच्च शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क माफी लागू करावी, तसेच समाजातील सगे-सोयरे यांना देखिल सवलत मिळावी, मराठा समाज बांधवांना विशेष कायदे आणि संरक्षण दिले जावे, या मागण्या मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, आणि सामाजिक स्थितीच्या उन्नतीसाठी मांडल्या जात आहेत. इत्यादी मागण्या पुर्ण करण्यात याव्यात यासाठी मनोज दादा जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी येथे विशाल वडगुले, भास्कर झाल्टे, विष्णु चव्हाण, प्रकाश जगताप, भिमराज लोखंडे, निवृत्ती खालकर हे साखळी उपोषणाला बसले आहेत.
समाजाच्या वतीने रविवार दि. २२ रोजी आक्रोश आत्मक्लेश मोर्चा काढण्यात आला होता, परंतु त्यावर न थांबता आपल्या उपोषणावर मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार विशाल वडगुले यांनी याप्रसंगी व्यक्त केला मराठा समाजाच्या आरक्षणावर शासन प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
0 Comments