धनगर समाज बांधवांनी महामेष योजनेचा लाभ घ्यावा - इंजि. बिरू शिंदे

 Bay- team aavaj marathi 

सिताराम पिंगळे सर पत्रकार मांडवड नांदगाव (नाशिक)

 महाराष्ट्र राज्यातील सन 2024-25 मध्ये राज्यातील भटक्या जमाती- क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमाती करता राजे यशवंतराव होळकर महामेष योजना झाली आहे यात मेंढी पालन करणे , जागा खरेदी करता अनुदान देणे व 100 कुक्कुट पक्षांची खरेदी व संगोपण करण्यासाठी अर्थसहाय्य करणे या योजना राबविण्यासाठी संदर्भीय शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे.

ही योजनेच्या अंमलबजावणी करिता मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या असून सोबत सलग्न करण्यात आलेली आहेत. या योजने अंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करून लाभधारक निवड प्रक्रिया राबविणे लाभार्थी निवड समितीमार्फत लाभार्थ्यांची प्राथमिक निवड करणे. निवड झालेल्या प्रत्येक कडून कागदपत्रे अपलोड करून घेणे, विविध स्तरावरून कागदपत्रांच्या छाननी करणे, व लाभार्थी निवड मार्फत अंतिम निवड यादी तयार करणे. इत्यादी प्रक्रिया महामंडळ करणार आहेत.सर्व समाज बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते इंजि.बिरू शिंदे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments