हातात पिवळा ध्वज घेऊन हजारो धनगर समाज बांधवांनी दि २३ रोजी समाजाच्या विविध मागण्यांसाठी मेंढ्या बकर्यांसह आंदोलन छेडले होते. या दरम्यान यळकोट यळकोट जय मल्हार चा जयघोष करीत आंदोलक आक्रमक झाले होत ते आपल्या मागण्यांवर ठाम होते. एका बाजूला आंदोलक तर दुसर्या बाजूला शेकडो पाळीव शेळ्या मेंढ्या ना देखील आंदोलनात सामील केले होते.आसे हे आगळे वेगळे आंदोलन पोलिसांनी संयमाने हाताळले.
नाशिक जिल्ह्यात सर्वच तालुकास्तरावर हे आंदोलन छेडण्यात आले. याचे परीणाम रस्ता वाहतुकीवर झाले .प्रवासी गाड्या, खाजगी वाहने मालवाहु ट्रक, ॲटो, इतर लहान मोठी वाहने रस्ता रोकोने थांबुन होती जिल्हात नांदगांव नाशिक, बागलाण, मालेगांव ,येवला, सह सर्वञ आंदोलन छेडण्यात आले होते.
असाच काही प्रकार राज्यात धनगर समाजाच्या वतीने विविध मागण्यासाठी सर्वञ रास्तारोको आंदोलन छेडल्याचे दिसून आले. यामुळे अनेक प्रमुख शहरातील व रस्त्यावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. नांदगांव येथे देखील सुमारे ४० मिनीटे धनगर समाजाच्या वतीने एकञ येऊन मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. यावेळी दुतर्फा सुमारे दिड ते दोन कि.मी अंतर वाहनांची रांग लागली होती.
यावेळी समाजाची प्रमुख मागणी म्हणजे अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समावेश करण्यात यावा, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती मिळाव्यात,समाजाला शेती, पशुपालन, तसेच लघु उद्योगांसाठी विशेष आर्थिक सहाय्य, सबसिडी आणि कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, समाजातील तरुणांना व जेष्ठ नागरिकांना सन्मान जनक वागणूक मिळावी म्हणून विशेष कार्यक्रम राबविण्यात यावा.
इत्यादी मागण्याचे निवेदन याप्रसंगी सरकारच्या वतीने महसूल विभागास देण्यात आले. दरम्यान हे आंदोलन आटोपल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना बराच वेळ लागला.
0 Comments