गुड शेफर्ड स्कूल नवीन इमारतीचे लोकार्पण

 Bay- team aavaj marathi 

सिताराम पिंगळे सर पत्रकार मांडवड (नांदगाव)

मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूल मध्ये नर्सरी, ज्युनियर केजी, सिनीयर केजी या वर्गांसाठी नुकतेच नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे.‌ या इमारतीचे लोकार्पण संस्थेचे अध्यक्ष मा. स्टेनली कडकडा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. नितीन जोसेफ, सौ. मनिषा जोसेफ व प्राचार्य डॉ. क्लेमेंट नायडू यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गिताने करण्यात आली. देवाचे वचन संस्थेचे संचालक डॉ. नितीन जोसेफ यांनी सादर केले. त्यानतंर शाळेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.

सी.एम.ई.एफ. ट्रस्ट देशातील शिक्षण क्षेत्र मजबुत करण्या -साठी वेगवेगळया माध्यमातून मदत करत आहे. मनमाड सारख्या शहरात गेली अनेक वर्षांपासून गुड शेफर्ड स्कूल ICSE बोर्ड ची शाळेने गरीब विद्यार्थ्याना माफक दरात शिक्षन उपलब्ध करुन दिले आहे. 

लहान गटातील मुलांसाठी भव्य प्रशस्त इमारत संस्थेने बांधुन दिली आहे. असे अध्यक्षीय भाषणामध्ये चेअरमन मा. स्टेनली कडकडा यांनी सांगितले. सुत्रसंचलन शिक्षक श्री भाऊसाहेब दाभाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ क्लेमेंट नायडू यांनी केले. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments