होरायझन ॲकॅडमी येथे जंगल पार्टीचे आयोजन

 Bay- team aavaj marathi 

सिताराम पिंगळे सर पत्रकार मांडवड नांदगाव (नाशिक)

मराठा विद्या प्रसारक समाजाचे, होरायझन  अकॅडमी, नांदगाव या शाखेमध्ये विद्यार्थ्यांना वन्य जीवनाची ओळख होण्यासाठी व त्याची माहिती मिळण्याच्या हेतूने जंगल पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाचे उद्घाटन म.वि. प्र. नांदगाव तालुका संचालक इंजि.अमित भाऊ बोरसे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. सोबत ज्येष्ठ नागरिक रमेश अण्णा बोरसे उपस्थित होते. 

या उपक्रमात विद्यार्थ्यांना वन्य जीवनाशी संबंधित विविध देखाव्यांचे आयोजन करण्यात आले होते त्यात डोंगर, नदी, झाडे, शेती किल्ला, गुहा, शेततळे, विहीर,जंगली, प्राणी,  पाळीव प्राणी, झाडे, फुलझाडे, जंगल यांचे देखावे या ठिकाणी उभारण्यात आली होती.

 विद्यार्थ्यांनी प्रत्येक देखावा अनुभवला व त्यातून प्रत्येक देखाव्यांच्या माध्यमातून त्यांची नावे आणि त्यांची कार्य समजून घेतली.चिमुकल्या विद्यार्थ्यानी वन्य प्राणी व पाळीव प्राणी यांच्या प्रतिकृती वेशभूषा केली होती.या उपक्रमाचे मार्गदर्शन शाळेच्या प्राचार्या श्रीमती पुनम डी मढे यांनी केले. यावेळी पालकांनी उपक्रम बघण्यासाठी गर्दी केली होती. तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments