बीड जिल्ह्यात जिजाऊ मासाहेब मल्टीस्टेट बँकेत 300 कोटींचा मल्टिस्टेट घोटाळा करून फरार झालेल्या मुख्य सुत्रधार बबन शिंदे याला अखेर बीड पोलीसांनी उत्तर प्रदेशातील मथुरा वृंदावन येथून अटक केली आहे. आरोपी बबन शिंदे याच्यावर बीडसह धाराशिव जिल्ह्यात जिजाऊ मासाहेब मल्टीस्टेट बँकेत सुमारे 300 कोटींचा मल्टिस्टेट घोटाळा केल्या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
बीड पोलिसांनी कारवाई करून शिंदेला अटक केली. तो उत्तर भारतात दिल्ली, नेपाळ, आसाम, ओरिसा, उत्तर प्रदेश येथे तो वर्षभर लपून बसला होता. अखेर त्याला वृंदावनच्या श्री कृष्ण मंदिर परिसरातून अटक करण्यात आली. बीडचे बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ दिलेल्या माहितीनुसार, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांची फसवणूक केल्या प्रकरणी त्याचे विरुद्ध गुन्हे दाखल आहेत.
तीनशे कोटींहून अधिकचा घोटाळा करून तो फरार झाला होता. जवळपास वर्षभर पोलीस त्याचा शोध घेत होते. पोलीस अधिकारी बराच वेळ त्याचा कसून शोध घेत होते. गुप्त माहितीवरून त्याचे लोकेशन उघड झाले. बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी योग्य त्या सूचना दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेने बबन शिंदे याला वृंदावन, उत्तर प्रदेश येथून २४ सप्टेंबर २०२४ रोजी अटक केली. विशेष म्हणजे बबन शिंदे हा संत-महंताच्या वेशात वृंदावन येथे राहत होता. त्यांच्यावर कोट्यवधींचा घोटाळा करून ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. बीड जिल्ह्यातील जिजाऊ मासाहेब मल्टीस्टेट बँकेत ३०० कोटींचा घोटाळा करून तो फरार झाला होता.
0 Comments