प्रसिद्ध शिवपुराण कथाकार पंडित प्रदिप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेचा शुभारंभ आज गुरुवार दि.२६ होत असून, कथे साठी तयार करण्यात आलेल्या सभा स्थळाची अंतिम टप्प्यातील नियोजनाचे आ. सुहास अण्णा कांदे यांनी बुधवारी सुक्ष्म नियोजनाचे प्रत्यक्ष पाहाणी करून आढावा घेतला.भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणुन सर्व स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांना सूचनाही केल्या.
हा कार्यक्रम नांदगाव-मनमाड रस्त्यावर हिरे नगर शिवारात २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान प्रसिद्ध शिव महापुराण कथाकार पं. प्रदीप मिश्रा यांचे कथा वाचन होणार आहे. त्यासाठी पं.मिश्रा यांचे आगमन झाले असून आ. कांदे व सौ अंजुमताई यांनी भव्य स्वागत केले. ह्या कथेसाठी ४० एकरावर जय्यत तयारी करण्यात आली आहे.
कथेला लाखोंच्या संख्येने भाविक येण्याचा अंदाज असल्याने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मुख्य मंडपाच्या प्रवेशव्दारा समोर तात्पुरत्या स्वरूपात बसस्टॅन्ड उभारण्यात आले आहे. त्यामुळे बसने येणारे भाविक थेट प्रवेशव्दारा समोर उतरतील. तालुक्यातील भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक गावात कथे साठी येणार्या भाविकांना क्यू आर कोड असलेले ओळखपत्र कार्यकर्त्यां -च्या माध्यमातून घरपोच देण्यात आले.
भाविकांच्या संख्येनुसार नांदगाव-मनमाड आगाराच्या अतिरिक्त बसेस कथा स्थळी येण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत. भाविकांसाठी ५०० मोबाईल प्रसाधनगृहे, स्नानगृहे, आरोग्याची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी सुसज्ज रूग्णवाहिके सोबत ३० ते ४० रूग्णांना सामावून घेता येईल असे भाविकांसाठी तात्पुरत्या स्वरुपातील रुग्णालय देखील तयार करण्यात आले आहे. याशिवाय ३ फिरते दवाखाने, ८ रूग्ण वाहिका सभास्थळी पूर्णवेळ उपलब्ध ठेवल्या जाणार आहेत. एम.डी, एमबीबीएस, जनरल फिजिशियन तज्ञ डॉक्टर आणि त्यांच्या मदतीला परिचारिका आरोग्य सेवक आरोग्य व्यवस्था सांभाळणार आहेत. दिव्यांगसाठी विशेष खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
मंडपात जागोजागी कुलर, पंखे, वॉटर स्प्रिंकलर ची व्यवस्था केली जाणार आहे. भाविकांना पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था २४ तास सुरू राहणार आहे. सुरक्षेसाठी १२५ सी.सी. टी.व्ही,भव्य एल.ई.डी, शंभराहून अधिक भोंगे अत्याधुनिक ध्वनिक्षेपकांची व्यवस्था होत आहे. मुख्य सोहळ्याच्या समोर चार एकरात भोजनासाठी मोठा मंडप, त्यात शेकडो आचारी, भोजनाची व्यवस्था अशी जय्यत व्यवस्था राहणार आहे. नांदगाव शहर व पंचक्रोशीतील भाविकांना शिव महापुराण कथेची पर्वणी म्हणजे कुंभमेळ्याची अनुभूती मिळणार आहे.शिवभक्तांनी मोठ्या संख्येने कथेला उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार सुहास कांदे व अंजुम कांदे यांनी केले आहे.
0 Comments