अंगावर पेट्रोलचा फुगा फेकून व कोयत्याने जखमी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

 Bay -team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक) 

 नांदगांव शहरात पोलिस ठाण्याजवळ एकाच्या अंगावर पेट्रोलचा फुगा  फेकुन जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणे व त्याच व्यक्तीला कोयत्याने गंभीर वार करुन गंभीर इजा करणे या प्रकरणी दोघा पिता पुञावर हापमर्डरचा गुन्हा दाखल झाला आहे.

अलीकडे नाते गोते विसरून सुडाने पेटून उठलेल्या  आत्या भावाने मामे भावाला अंगावर पेट्रोलचा फुगा फेकुन माचिसची गाडी लाऊन जिवंत जाळुन मारण्याचा प्रयत्न करणे व कोयत्याने गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न झाल्याने शहरात या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याची चर्चा ठिकठिकाणी सुरू आहे. आज तु वाचला नाहीतर तुझा कार्यक्रमच केला असता असा सज्जड दम भरुन आत्याच्या मुलाने मामाच्या मुलाला प्लास्टिक पिशवीत पेट्रोल भरलेला फुगा अंगावर फेकुन माचीसची काडी उगळून फिर्यादीच्या अंगावर फेकुन जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणे? व दुसर्याने कोयत्याने गंभीर वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

या घटनेची नांदगांव पोलिसानी गंभीर दखल घेत संशयित आरोपी राहुल शिवाजी पिरनाईक यास अटक केली आहे व दुसरा संशयीत आरोपी हा अल्पवयीन आहे . या संदर्भात नांदगांव पोलीसात घटनेची गु र न ४०१ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १०९,३५२,३५१.(२)(३) ३(५)(६) प्रमाणे गुन्हा दाखल यातील फिर्यादी गोरख अंबू औशीकर वय ४२ रा. नांदगांव जतपुरा रोड गिरणानगर याने पोलिसात तक्रार नोंदविली की संशयीत आरोपी राहुल शिवाजी पिरनाईक व त्याचा मुलागा यांनी २३/९/२४ रोजी सकाळी १०.३० वा नांदगांव येथील पोलीस ठाण्या पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हुतात्मा चौकात एका मोटर सायकल गॅरेज समोर मागील किरकोळ कारणा वरुन संशयीत बाप बेट्यांनी संगणमत करुन फिर्यादीच्या अंगावार प्लास्टिक पिशवीत पेट्रोलने भरलेले फुगे फेकुन त्याला आग काडीने पेटवून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. व कोयत्याने गंभीर दुखापत केली.

या कारणावरून नांदगांव पोलिसात गंभीर स्वरुपाचा गुन्हा नोंद झाला आहे. घटनेचा तपास पो नि प्रितम चौधरी व सहाय्यक पो नि सुनिल बढे व पो ह तपास घेत आहे घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा अल्पवयीन असल्याचे सांगण्यात आले या घटनेने नांदगांव शहरात पेट्रोल चे मानवी फुगे व कोयता यांचा वापर झाल्याने या घटने बाबद वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी गंभीर नोंद घेतली आहे.या घटनेतील नोंद नसलेल्या सरोदे नामक एका रिक्षा चालकाने फिर्यादी संशयीत आरोपी यांची भानगड सोडविण्याचा प्रयत्न केला त्यात सरोदे यांचा एक हात गंभीर जखमी झाला असून त्याची आर्थीक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे त्यामुळे उपचारा वाचून ते विह्लळत आहे.

Post a Comment

0 Comments