नांदगाव ते मनमाड मार्गावर आज पहाटे पाच ते साडेपाचच्या दरम्यान हिरेनगर फाट्यावर एक्स.यू. व्ही व टी.यू.व्ही या दोन वाहनांच्या समोरा -समोर अपघातात झाला त्यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाले असून चारजण जखमी असल्याचे समजते.
हा अपघात इतका भिषण होता की यात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात दोन मयत झाले असून, त्यांची नावे मात्र अद्याप कळाले नाही.
तर जखमी मध्ये आशा शिवाजी देशमुख वय ५५, रा.मोहाडी,गजराबाई देशमुख वय ६० वर्ष विकास शिवाजी देशमुख वय ३५ हे सर्व राहणार मोहाडी तसेच नारायण सुकदेव महाजन वय ७०- राहणार पाचोरा जळगाव येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती कळताच पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. व स्थानिकांच्या मदतीने त्यांनी जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.
0 Comments