नवनिर्वाचित अध्यक्ष किसनराव जगधने यांचे अभिनंदन करतांना जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे ते आज गुरुवार दि २६ रोजी देना लक्ष्मी कृषक सेवा सहकारी संस्था मर्यादित. नांदगांव जि. नाशिक या संस्थेच्या अध्यक्ष पदी संचालक किसनराव जगधने यांनी बिनविरोध निवड झाली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते.संस्थेचे मावळे अध्यक्ष विठ्ठल दादा आहेर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्या नंतर रिक्त झालेल्या जागेवर जगधने यांची सर्वानुमते निवड झाली या निवडी प्रसंगी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, युवकांचे आशास्थान विष्णु निकम, माजी सभापती सुधीर देशमुख, हरेश्र्वर सुर्वे, माजी अध्यक्ष विठ्ठल आहेर, उपाध्यक्ष इंदुबाई बोरसे, संचालक कारभारी काकळीज, गोगुळ रोंदळ, दौलत काकळीज, माणीक मोरे, उमाकांत थेटे, शेषराव घुगे,निवृत्ती बागुल, विश्वनाथ सानप, प्रमिला बाई विठ्ठल काकळीज आदी संचालकांनी नवनिर्वाचित अध्यक्ष जगधने यांचे अभिनंदन केले. यावेळी बोलताना अध्यक्ष जगधने म्हणाले की माझी अध्यक्षपदी निवड होण्यासाठी आपले सर्वांचे योगदान असून माझ्यावर ठेवलेल्या विश्वासास मी तडा जाऊ देणार नाही असा शब्द देतो अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. |
0 Comments