Bay- team aavaj marathi
नाशिक जिल्ह्यात इतर बस आगाराच्या तुलनेत जुनाट बसेस रस्त्यावर चालवून चांगली कमाई करणारा नांदगांव बस आगार नेहमीच रस्त्यावर बंद पडणार्या बसेसमुळे चर्चेत असतो. असाच काही प्रकार गुरुवार दि १९ रोजी घडला. नांदगाव येथून घाटमाथ्यावर सायंकाळी सात वाजता प्रवासी घेऊन निघालेली M.H.07/C-9104 ही बस बोलठाणच्या दिशेने निघाली. कासारी गाव सोडल्यानंतर या बसमध्ये सुमारे तीस घेऊन ही गाडी चांदेश्वरीचा घाट चढत असताना अवघड वळनावर चढ चढण्यासाठी लागणारा स्पेशल गेअर चालकाने प्रयत्न केले परंतु काही केल्या गेअर पडत नसल्याने ही गाडी अंधार्या राञी चालकाने ब्रेक लावून थांबवली.
हा सर्व प्रकारामुळे अंधारी रात्र व गाडी घाटात थांबल्याने प्रवाश्यांचा जिव टांगणीला लागला. परंतु परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गाडीतील सर्व पुरुष प्रवाश्यांनी गाडी मागे येवू नये म्हणून समंजस पणे गाडीच्या खाली उतरले. व मोबाईल च्या उजेडात बाजुचे मोठमोठे दगड आणून गाडीच्या टायरला ओट्या लावून गाडी थांबविण्यासाठी मदत केली.
हा सर्व प्रकार सुरू असताना या बस च्या वाहकाच्या मदतीने चालकाने अखेर चढ चढण्यासाठी लागणारा स्पेशल गेअर टाकून गाडी घाट चढवून वर आणली.आपला जिव धोक्यात घालून मोठ्या दगडाच्या ओटी लावल्या नसत्या तर कदाचित अनर्थ घडला असता.
मात्र गाडीला दगडाची ओटी लावून मदतीसाठी खाली उतरलेल्या धनराज पवार, नाना पाटील, दिपक पवार विलास पेहरकर इत्यादी आठ दहा पुरुष प्रवाश्यांना अंधारात अर्धा किलो मीटर घाटात पायपीट करावी लागली.
त्यामुळे त्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. या बाबत बोलताना प्रवासी धनराज पवार यांनी घेतलेल्या माहिती नुसार नांदगाव आगारातील सध्या असलेल्या ४७ बसेस पैकी ठराविक बसेस पाच/सात वर्षाच्या आतील असून इतर सर्व बस जवळपास चौदा वर्षांपेक्षा अधिक जुनाट झालेल्या बसेस आहेत. तरी परिवहन महामंडळास जिल्ह्यातील इतर आगाराच्या तुलनेत चांगली कमाई करणारा नाव लौकीक असलेल्या नांदगाव आगारास परिवहन महामंडळाने नवीन बसेस देवून प्रवाश्यांना दिलासा द्यावा असे पवार म्हणाले.
0 Comments