० ते २० पट संख्या असलेल्या जिल्हा परीषद शाळेवर सेवा निवृत्त झालेले व पदवी धारकांची कंञाट पध्दतीने भरतीचा निर्णय रद्द करावा तसेच शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा त्वरीत राबविण्यात यावा या मागणी साठी नांदगाव येथे लाक्षणिक उपोषन करण्यात आले.
या उपोषनात आर पि आय पक्षाच्या वतीने नांदगांव सक्रिय सहभाग नोंदवून कार्यकर्ते उपषनात सामील झाले होते,नांदगांव तहसिल कार्यालया समोर हे उपोषन करण्यात आले असून या उपोषनास प्रभारी गटशिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले यांनी भेट देऊन उपोषणार्थींच्या मागण्या चे निवेदन स्विकारले शासनाने शिक्षक दिनी निर्णय घेतला तो अत्यंत वेदनादायी आहे यात आर.टी.ई निर्णयास फाटा देऊन पोर्टल मार्फत भरती चालु असताना त्या निर्णयास फाटा देण्याचे काम केले जात असल्याचे याप्रसंगी उपोषण कर्ते मी व्यक्त म्हटले.
त्याचप्रमाणे काही कोर्ट केसेस दाखल आहेत. त्यावर निर्णय येई पर्यंत इतर सेवा निवृत्ताची भरती करु नये. हजारो बी. एड, डी. एड धारक सुशिक्षित बेरोजगारांना भरती प्रक्रियेत सामील करावे. पविञ पोर्टला नोंदणी केलेल्या उमेदवारांचा सहानुभूती पुर्वक विचार करावा, कञाटी भरती करु नये. शासनाने घेतलेला निर्णय रद्द करावा, अशी मागणी या दरम्यान करण्यात आली. या निवेदनावर आर.पि.आयचे अध्यक्ष महावीर जाधव, ज्योती गायकवाड, गितांजली निकम, प्राजक्ता खैरनार यांच्या सह्या आहेत .
0 Comments