वेहेळगाव येथील माध्यमिक विद्यालयात व्याख्याते हंकारे सर यांच्या व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद

 Bay -team aavaj marathi 

सचिन बैरागी पत्रकार नांदगाव (नाशिक)

माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यामंदिर वेहेळगाव येथे सन २००९ च्या इयत्ता १०वीच्या विद्यार्थ्यांच्या याच्या सौजन्याने व्याख्याते श्री.वसंत हंकारे सर यांचे "आयुष्याला दिशा देणारे" अतिशय प्रेरणादायी असे व्याख्यान संपन्न झाले यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 हांकरे सर यांनी "बाप समजून घेतांना" व " न समजलेले आई बाप"या दोन विषयांवर अतिशय सुंदर असे व्याख्यान सादर केले.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संचालक श्री.टी.एम. डोंगरे सर, श्री.किशोर भाऊ लहाने, शिक्षण अधिकारी जयवंत भाबड, माजी शिक्षणाधिकारी मोहन चकोर सर, कासारी विद्यालयाचे मुख्याध्यापक किशोर जाधव सर, नागरी पतसंस्था बोलठाणचे चेअरमन श्री.अमित नहार, संचालक नहाटा, कायस्थ सर, साबळे सर, बी.एस.भाबड सर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री.पठाण सर होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री.संजय डोमाडे सर यांनी केले. 

Post a Comment

0 Comments