नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील जिल्हा परिषद शाळेत ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा शहीद जवान संदीप भाऊसाहेब मोहिते यांच्या मातोश्री वीर माता मंदाबाई मोहिते होत्या. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक राजू भगवान काकळीज यांनी केले.शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत,ध्वजगीत व राज्यगीत सादर केले. मांडवड शाळा अंतर्गत वस्ती शाळांची विद्यार्थी व शिक्षक या कार्यक्रमास उपस्थित होते यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यावर नृत्य सादर केले. हे नृत्य बघून गावकरी विद्यार्थी शिक्षक अगदी मंत्रमुग्ध झाले होते. तसेच भाषणे चित्रकला,निबंध स्पर्धा, क्रीडा स्पर्धा आदींचे आयोजन देखील जि.प.शाळा मांडवड वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय मुख्याध्यापक राजू काकळीज यांनी केले.
तर आभार जि प शाळा महापुरुष बाबा शाळेचे शिक्षक अनिल आहेर यांनी केले. कार्यक्रमासाठी जनता विद्यालय मांडवड, ग्रामपंचायत मांडवड,आजी-माजी सैनिक, तंटामुक्ती समिती, अंगणवाडी सेविका, अशा सेविका, आरोग्य विभागातील कर्मचारी,पोलीस पाटील,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, ग्रामस्थ, विद्यार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
0 Comments