Bay- team aavaj marathi
सचिन बैरागी पत्रकार नांदगाव (नाशिक)
नांदगाव पोलीस ठाण्यात पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व आडत व्यापार्यांची बैठक घेतली. या बैठकीत मध्ये पोलीस निरीक्षक चौधरी यांनी संवाद साधताना व्यापार करत असताना काही अडथळा निर्माण होत असेल तर त्वरित पोलिस ठाण्यात संपर्क साधावा समस्याचे निवारण केले जाईल असे आश्वासन दिले.
यावेळी शेतकरी बांधवांनी शेती माल विक्रीसाठी आणलेल्या बहुतेक ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसल्याने, अनेक अपघात होत असतात तरी ट्रॅक्टर मालकांना रिफ्लेक्टर बसवण्याच्या व्यापारी वर्गातर्फे सूचना कराव्या असे सांगण्यात आले.
तसेच काही व्यापारी वर्गाचे कांदा खळे मांडवड रस्त्यावर असल्याने या भागातील व्यापारी बांधवांना आपला शेतमालाचे मालवाहतूचे ट्रक शहरातील मटन मार्केट मधून नेण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असतो. या मटन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करत व्यावसायिकांनी दुकान थाटले असल्याने या अडचणी निर्माण होत असून या अतिक्रमण धारक व्यावसायिकांना तेथून हटवून रहदारीस होणारा अडथळा दूर करावा अशी मागणी करण्यात आली.
या बैठकीसाठी पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेवून रहदारीची समस्या दुर करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी पो.हवा.माळी, पो.कॉ मेहेर, सचिन मुंढे यांच्यासह बाजार समितीचे सचिव अमोल खैरनार व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यापारी वर्गातर्फे बाजार समितीचे संचालक कांदा व्यापारी यज्ञेश कलंत्री यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले.
0 Comments