Bay-team aavaj marathi
किरण काळे पाटील पत्रकार नांदगाव (नाशिक)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लांबबर्डी (साकोरा) येथे भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी गावातून प्रभातफेरी काढण्यात आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी भारत मातेच्या जयजयकारचा करत आसमंत दणाणून सोडला त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लांबबर्डी येथे ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी भूमिपुत्र भारतीय सैन्यदलात कार्यरत असणारे भारतीय जवान श्री.प्रकाश बाळू घाटाळे व श्री.भिमा गणपत घुगसे यांच्या मातापित्यांचा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नारायण भसरे व ग्रामपंचायत सदस्या यशोदाताई डोळे तसेच माजी ग्रामपंचायत सदस्या अलकाताई डोळे यांनी शाळेतर्फे सत्कार केला.
प्रसंगी विद्यार्थ्यांनी संगीतमय कवायत सादर केली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा व प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
शाळेचे माजी विद्यार्थी अर्जुन घुगसे यांनी सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले तसेच इतर पालकांनीही विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. शाळेचे मुख्याध्यापक अविनाश खोंडे यांनी उपस्थित नागरिकांना संविधान अमृत महोत्सव निमित्त घरघर संविधान उपक्रमाची माहिती देऊन उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून घेतले तसेच राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सर्व नागरिकांनी मतदार प्रतिज्ञा शपथ घेतली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक उमेश बोरसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गजानन घाटाळे, मनीषा घाटाळे, रंजना मोरे व योगिता बोरसे यांनी मेहनत घेतली.
0 Comments