Bay- team aavaj marathi
सिताराम पिंगळे सर पत्रकार नांदगाव (नाशिक)
नांदगाव तालुक्यातील मांडवड रस्त्यावरील पांझण रेल्वे स्थानकावर गेल्या चार वर्षापासून पॅसेंजर थांबत नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. कोरोना पासून बंद केलेल्या पॅसेंजर गाड्या थांबा अजूनही बंदच असल्याने येथील प्रवाशांची गैर होत असून या गाड्यांचा थांबा पूर्ववत सुरु करण्याची मागणी मांडवड सह पंचक्रोशीतील नागरिकांनी केली आहे. येथील पॅसेंजर गाड्यांचा थांबा पुर्व व्रतं करण्यात यावा यासाठी परिसरातील ग्रामपंचायतीच्या ठराव घेऊन नागरिकांचे शिष्टमंडळ खा. भास्कर भगरे आणि तालुक्याचे भाग्यविधाते आ.सुहास अण्णा कांदे यांची भेट घेणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,मध्य रेल्वेच्या नांदगाव मनमाड दरम्यान पांझन रेल्वे स्टेशन आहे, या स्थानकावर कोरोनाच्या अगोदर मुंबई- भुसावळ, देवळाली- भुसावळ या पॅसेंजर गाड्यांना थांबा होता अनेक वर्षांपासून या गाड्या या स्थानकावर नित्य- नियम थांबायच्या मात्र कोरोना नंतर पॅसेंजर थांबा बंदच केला त्यामुळे पांझण रेल्वे स्थानकावर गाड्या थांबत नसल्याने पंचक्रोशीतील मांडवड, लक्ष्मीनगर, वडाळी, भालूर, मोहेगाव लोहशिंगवे व इतर गावे येथील प्रवाशांना नासिक-मुंबई तसेच जळगाव-भुसावळ आदी कडे जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे प्रवासाचे साधन होते.
परंतु पॅसेंजर गाड्या बंद झाल्यानंतर पंचक्रोशीतील प्रवाशांना मोठे हाल सहन करावे लागत असल्याने हे "रेल्वे स्थानक असून घात नसुन खोळंबा " झाल्याने वरील मागणीसाठी परिसरातील ग्रामपंचायतीच्या ठराव घेऊन नागरिकांचे शिष्टमंडळ खा. भास्कर भगरे व आ. सुहास अण्णा कांदे यांची भेट घेणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
या भागातील मांडवड आणि लक्ष्मीनगर महामंडळाची बस सुविधा देखील उपलब्ध नसल्याने प्रवाशांना येण्या जाण्यासाठी आता ना रेल्वे,ना बस अशी परिस्थिती निर्माण झाली आहे प्रवाशांना प्रवास करायचा असेल तर किंवा महत्त्वाच्या कामांसाठी बाहेरगावी जायचं असेल तर येथून नांदगाव तसेच मनमाड आदी ठिकाणी जाऊन पुढील प्रवास करावा लागतो यात जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण यांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे जर प्रवाशांना कुठे जायचं असेलच तर स्वतःचे वाहन घेऊन जावे लागते त्यात मोठा खर्च सहन करावा लागत आहे.
मांडवड तालुक्यातील मोठं गाव आहे आमच्या पांझण रेल्वे स्थानकावर मुंबई भुसावळ पॅसेंजर थांबाच बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आह स्थानिकांच्या दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे
अशोक निकम
शिवबा ग्रुप संस्थापक अध्यक्ष
मी आता महाविद्यालयात द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे आम्हाला महाविद्यालयात जाण्यासाठी ना बस, ना रेल्वे अशा परिस्थितीमुळे शैक्षणिक नुकसान होत आहे.
ओम पिंगळे विद्यार्थी, मांडवड
ओम पिंगळे
विद्यार्थी
0 Comments