Bay- team aavaj marathi
नांदगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भरत पारख यांनी नुकतेच प्रयागराज येथे जाऊन महाकुंभ मेळ्यात गंगास्नान करुन देविदेवतांसह तेथील साधुग्राममध्ये जावून साधुमहंतांचे यथोचित आनंद घेतला त्यांनी कथन केलेला अनुभव आपल्या सर्वांना प्रेरणादायी ठरेल.
त्यांच्याच शब्दांत कथन केलेला अनुभव मी कालच #प्रयागराज वरून आलो. काल रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत बद्दल कोणीही धसका घेऊ नका, करोडो #हिंदू एकत्र आलेत हे महत्वाचं आहे, आणि एव्हढ्या गर्दीत अशी घटना होणे काही नवीन नाही, शिवाय ती घटना आणि आधीची जळीत घटना #योगी #Yogi Adityanath #NarendraModi सरकारच्या अधिकार्यांची मोजून २० मिनिट आणि २ तासात निकाली लावली हे मात्र कोणी दाखवत नाही हे हि लक्षात घ्या, कारण आपल्याला चटपटीत बातम्या आवडतात म्हणून तेच दाखवले जाते, पण घटनेनंतर सर्व सुरळीत आहे.
#माझा_अनुभव : अतिशय #उत्तम अनुभव आहे, आपण हि नक्की जा, कोणालाही काहीही विचारू नका, लोक काहीही सांगतात , बाकी तिथे खूप सर्व व्यवस्था करण्यात आली आहे, संगमावर जाऊन आपण स्नान करू शकतात, जागोजागी कपडे बदलण्यासाठी व्यवस्था आहे, पाणी, व्हील चेअर ची व्यवस्था आहे, लाखो पुलिस आहे, खोया पाया सेंटर आहेत, खाण्या पिण्यासाठी हजारो stall आहेत, पाहण्यासाठी मोठ मोठे प्रोजेक्ट आहेत, १५०० पासून रूम्स मिळतील , फ्री च्या फांद्यात पडू नका, उगाच शोधायला वेळ जाईल.
विशेष म्हणजे खूप चालायची भीती दाखवणार्या व्हिडीओ पासून दूर राहा , शाही स्नान असेल त्या दिवसा आधी एक व नंतर १ दिवसच आपल्याला चालावे लागेल अन्यथा इतर दिवशी फक्त २/३ किमी चा रस्ता आहे तो हि अगदी हसत खेळत पार होतो. या महाकुंभात का जावे तर आपल्या पुढील २ पिढ्या जाऊ शकणार नाही म्हणून जा.
आपल्या श्रद्धेसाठी जा. हिंदू धर्मा साठी जा. सुख शांती साठी जा. एक विलक्षण अनुभवा साठी जा. आपल्या हिंदू संस्कृती ला जवळून पाहण्यासाठी जा , लाखो साधू संत भेटतील म्हणून जा, जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी जा, कायमस्वरूपी लक्षात राहील म्हणून जा. प्रत्येकाला अभिमानाने सांगता येईल म्हणून जा..... असे अनेक कारणे आहेत म्हणून जा ...पण शक्य असेल मनात असेल तर नक्की जा .... कोणालाही काहीही विचारू नका.....जा .
ok .... नक्की जा आणि हि माहिती इतरांनाही द्या .
भरत पारख
0 Comments