Bay- team aavaj marathi
प्रज्ञानंद बापू जाधव पत्रकार नांदगाव (नाशिक)
नांदगाव येथे दि. २९ रोजी बुधवारी जुन्या तहसील कार्यालयाजवळ संविधान सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 90 हजाराच्या मताधिक्याने लीड घेऊन निवडून आलेले लोकप्रिय विकास पुरुष जनसेवक आ. सुहास आण्णा कांदे यांचा नागरी सत्कार करून आयोजक मनोज चोपडे यांच्या वतीने आणि उपस्थित मान्यवर,जेष्ठ नागरिकांच्या हस्ते देखील करण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थित शिवसेना प्रवक्ते राजु वाघमारे, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष नाशिकचे माजी महापौर अशोक दिवे यांनी उपस्थित जनसमुदायास पचनी पडेल अशा भाषेत आ. सुहास अण्णा कांदे यांच्या बाबतीत गौरवोद्गार काढत माजी मंत्री छगन भुजबळ यांना टोला लगावला.
जागर लोकशाहीचा गौरव संविधानाचा सोहळ्या प्रसंगी उद्घाटक म्हणुन प्रवक्ते तथा उपनेते शिवसेना राजु वाघमारे, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अशोक दिवे, तर स्वागत अध्यक्ष म्हणुन चेतन पाटील हे होते.यावेळी शिवसेना प्रवक्ते राजु वाघमारे यांनी आपल्या भाषणात आ. सुहास अण्णा कांदे यांचे कौतुक करत अण्णांचा विकास कामाचा डंका वाजवला. माघिल वेळी आ. कांदे विकास पुरुषांबद्दल केलेली थोडाफार चूक मान्य करत "कांदे तिखट राहिलेलेच बरे" असे म्हणुन भाषणाला सुरुवात केली.
या सोहळ्या प्रसंगी सामाजिक क्षेत्रातील तसेच पत्रकार बांधव,उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरिकांचा, देखील मान्यवरांच्या हस्ते गौरीविण्यात आले होते. ते पुढे म्हणाले की, आपले मूर्ती मंत्र, आमदार संविधानाचे पालन करून प्रत्येक समाजातील जनतेला घेऊन करतात तसेच लोकशाही टिकवण्याचे काम संविधानामुळेच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चहा विकत होते तसेच माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील रिक्षा चालवत होते हे संविधानामुळेच सर्वोच्च पदापर्यंत पोचले आहे.आ. कांदे लवकरच स्व गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारणार आहे. राज्यात या तालुक्याचे लवकर नाव कळतं नव्हते, परंतु आता आण्णांच्या श्रेया मुळे नांदगाव नावारूपाला येत आहे.
यावेळी बोलताना नाशिकचे माजी महापौर अशोक दिव्ये यांनी देखील आपल्या भाषणात बोलतांना सांगितले इडापीडा संपली आहे. आपला कॉमन मॅन,सर्व सामान्य कार्यकर्ता,असलेले आ. सुहास अण्णा कांदे आपल्या दुसऱ्यांदा लाभले आहे. नाव न घेता मंत्र्यांना टोला लगावला आहे. अगोदर मुलगा नंतर पुतण्या 90 हजारांनी लीड घेऊन विजय प्राप्त केला आहे आता जरा लाज वाटू द्या मंत्री पद मिळाले नाही आता नांदगाव तालुक्यात मंत्री पद मिळू द्या. गरिबांची भाकरी कांद्या सोबतच गोड लागते आमचं कांदे भाकरीच नातं आहे उपस्थिती जनतेला पुढे म्हणाले अण्णांकडे कामा संदर्भात येऊन भेटा कधी नाही म्हणणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. त्याचप्रमाणे
बहुजनांचा नेता प्रामाणिक काम करणारा मनोज चोपडे यांच्या खांद्यावर हाथ असु द्या असे देखील वाघमारे व दिवे यांनी आ. कांदे यांना सांगितले होते.
यावेळी आ. सुहास अण्णा यांनी संविधान संदर्भात बोलत असताना म्हणाले की, वाघीनीच दूध म्हणजे संविधान जो वाचणार तो डरकाळ्या फोडल्या शिवाय राहणार मीं संविधान वाचले म्हणुन डर काळ्या फोडल्या माझे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते मला माय बाप जाणतेने मला 90 हजार मतांनी लीड देऊन निवडून दिले. त्याबद्दल मीं सर्वांचा ऋणी असेल येणाऱ्या काही दिवसातच मनमाड येथे भीम श्रुष्टि, उभारणार आहे. नांदगाव येथील संविधान चौक येथील कोणशीलासाठी 15 लाख मंजूर झाल्याचे देखील सांगितले आहे. नांदगाव येथील डॉ. आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा देखील लवकरच होणार आहे. तसचे इतिहासात नांदगाव चे नाव हे विकासासाठी कोरले जाईल असे ते म्हणाले व सर्व मान्यवरांचे व जनसमुदयाचे आभार त्यांनी मानले.
सदर कार्यक्रम हा नांदगाव पोलीस ठाण्या जवळ जुने तहसीलदार कार्यालय या ठिकाणी पार पडला यावेळी माणिकराव भंडगे (होलार महाराष्ट्र अध्यक्ष) चेतन पाटील माजी नगराध्यक्ष अरुण पाटील(माजी नगराध्यक्ष), RPI नेते देविदास मोरे, समाधान पाटिल, दीपक सोनवणे (जिल्हाध्यक्ष होलार समाज) दत्तराज छाजेड, शाम दुसाने, सुनील हांडगे, साईनाथ गिडगे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक मनोज चोपडे यांनी केले तर सूत्रसंचालन आनंद पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पवन महाले, कुणाल बच्छाव, रोहित जाधव, मोहित भोसले, दिपक अंभोरे, भूषण मराठे,सागर अडकमोल, अरबाज बेग, किशोर शिंदे, अजय अंभोरे, आदिनी अदिंनी परिश्रम घेतले.
0 Comments