मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले निवेदन

 Bay- team aavaj marathi 

प्रज्ञानंद बापू जाधव पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव येथील स्टेट बँकेच्या जवळ असलेल्या जुना थत्ते वाडा, श्री नांदेश्वर महादेव चौक येथील रहिवासी असुन माझ्या घरा लगत असलेल्या परिसरात दोन भटकी कुत्री आहेत. सदर व कुत्रे हे महादेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांवर त्याचप्रमाणे परिसरातील नागरिकांवर धावून जातात परिसरात लहान मुलांचा वावर जास्त असून बँकेत देखील अबाल वृद्ध नेहमी येत असतात.

 त्यांच्यापासून श्री नांदेश्वर महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या जिवीतास धोका निर्माण झाला असून, या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त तात्काळ करण्यात यावा यासाठी नांदगाव नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना परिसरातील नागरिकांच्या वतीने येथील रहिवासी प्रशांत आनंदराव वाघ, नांदेश्वर महादेव चौक, नांदगाव यांनी तीन दिवसांपूर्वी दिनांक 28 रोजी लेखी निवेदन दिलेले असून अद्यापही कुत्र्यांचा बंदोबस्त झालेला नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे.

 तरी मेहेरबान साहेबांनी तातडीने लक्ष घालून महादेवाचे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना त्याचप्रमाणे परिसरातील नागरिकांना आणि बँकेत येणाऱ्या ग्राहकांना कुत्र्यांचा बंदोबस्त करून दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.


 

Post a Comment

0 Comments