जातेगाव ग्रामसभेत आ सुहास अण्णा यांचा अभिनंदनाचा ठराव मंजूर इतर विविध विषयांवर चर्चा करून ठराव मंजूर

 Bay-team aavaj marathi 

भरत पाटील पत्रकार जातेगाव नांदगाव (नाशिक)

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे दि.२६ जानेवारी रोजी ग्रामस्थांच्या उपस्थिती अभावी तहकूब करण्यात आलेली ग्रामसभा सरपंच शांताबाई पवार यांच्या अध्यक्षतेखाली दि ३१ जानेवारी रोजी घेण्यात आली.

यामध्ये ग्रामपालीका सदस्य बाळासाहेब लाठे यांनी तालुक्याचे भाग्यविधाते आ सुहास अण्णा कांदे यांच्या आमदार निधीतून दलितवस्ती साठी विस लक्ष रुपयाचे बौद्ध विहार आणि १५ लक्ष रुपयांचा सामाजिक सभागृह बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ सुहास अण्णा यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला असता उपस्थित नागरिकांच्या वतीने राजु शेख यांनी अनुमोदन देवून वरील ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. 

त्याच प्रमाणे स्वतंत्र पाणी पुरवठा योजना करण्यात यावी. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी स्वतंत्र शेड उभारण्यात यावे.मुस्लीम स्मशानभूमीत नमाजपठण साधारण १००×१०० फुटाचे कॉंक्रिटीकरण करण्यात यावे. सुमारे साठ वर्षांपेक्षा अधिक कालावधी पासून वन जमीनी कसनार्यांच्या नावाने शासन निर्णयानुसार अंमलबजावणी करुन सम्बन्धित शेतकरी बांधवांच्या नावाने ७/१२ उतारे देण्यात यावे.

गावठाण च्या चारही बाजूंनी पथदिप लावण्यात यावे. त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांसाठी वयक्तीक विहीरीचा लाभ घेण्यासाठी झोन बंदिची अट रद्द करण्यात याव्यात तसेच ग्रामसभेसाठी तलाठी, कृषी सहाय्यक, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पशुवैद्यकीय अधिकारी इत्यादी उपस्थित रहात नसल्याने चंद्रभान झोडगे यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली.तसेच कैलास जोनवाल यांनी चर्मकार वस्ती येथील जंगली झाड आणि मातीचा ढिगारा काढून नागरिकांना रहदारी साठी रस्ता मोकळा करून देण्यात यावा अशी मागणी केली त्यास अरुण हिंगमिरे यांनी अनुमोदन दिले असता ठराव मंजूर करण्यात आला.

या सभेच्या सचिव म्हणून ग्रामपंचायत अधिकारी गोपाल चौधरी हे होते, तर त्यांना जेष्ठ लिपिक सोपान खिरडकर यांनी सहकार्य केले. यावेळी उपसरपंच पंढरीनाथ वर्पे,सदस्य रामदास पाटील,संदिप पवार,सुरेश जाधव, सौ.कांताबाई खिरडकर, सौ.कल्पना गायकवाड, सौ. शाबेराबानो शेख, सौ धनश्री पवार, सौ.अनिता निंबारे, सौ.वैशाली चव्हाण,सौ मनिषा पगारे, सौ.ज्योती पगारे, आणि सौ.पुजा जाधव हे सदस्य व सर्व ग्रामपालिका कर्मचारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित नागरिक चर्चेत सहभागी झाले होते.


Post a Comment

0 Comments