महाराष्ट्र राज्य आय.टी.आय. निदेशक संघटनांच्या नांदगाव शाखेची नवीन कार्यकारणी निवडणूक २०२५ करीता आज दि. १९ रोजी निवड प्रक्रिया पार पडली. या मध्ये दुपारी २ वाजे पर्यंत आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. यात अध्यक्ष पदासाठी श्री.पंढरीनाथ सटवाजी- -राव गायकवाड तसेच सचिव पदासाठी श्री.अरुण रमेश मढवई, कोषाद्यक्ष पदासाठी सौ. वनिता सुरेश बर्वे यांची बिनविरोध निवड झाली.
त्याचप्रमाणे सदस्य म्हणून श्री. मुकुंद दत्तात्रय निकुंभ, सदस्य सौ.कल्पना शांताराम काटे, श्री. नारायण शंकरराव सरनाईक, श्री.गोविंद राजेंद्र शिंदे,श्री.सुशील सुभाष तायडे आणि सौ.शर्मिला ज्ञानेश्वर उदावंत यांचे प्रत्येक एका पदासाठी अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे पदाधिकार्यांची बिनविरोध निवड झाल्याचे यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी एम.डी. निकुंभ यांनी जाहीर केले. अध्यक्ष व वरील सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांचे अभिनंदन करण्यात आले.
0 Comments