नांदगाव येथे मराठा विद्या प्रसारक समाज संचलित न्यू इंग्लिश स्कूल आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला .कार्यक्रमप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती काळे जे.आर,पर्यवेक्षक श्री.शेवाळे ए. एस.उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवातीला मुख्याध्यापिका श्रीमती काळे मॅडम यांनी जागतिक योग दिनी योगाचे जिवनातील महत्त्व यांविषयी माहिती दिली.
त्यानंतर क्रीडा शिक्षक पाटील पी.यू.व श्री.बागूल व्हि.के.यांनी योग प्रार्थनेने सुरुवात करून योगसाधना चे प्रात्यक्षिक करून घेतले.यात त्यानी योगसाधनां चे महत्व व गरज हे विशद केले. याप्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी योगसाधनेत सहभाग घेतला .त्यानंतर शांतीपाठाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी यांनी सहकार्य केले.
0 Comments