निसर्गाच्या सान्निध्यात कासलीवाल प्राथमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

 Bay- team aavaj marathi 

विजय जी चोपडा जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

 सौ.कमलाबाई माणिकचंद कासलीवाल प्राथमिक विद्यालयात आज आंतर्राष्ट्रीय योग दिन निसर्गरम्य वातावरणात, प्रफुल्लित मनाने आणि आनंददायी उत्साहात साजरा करण्यात आला. हिरव्यागार वृक्षराजीच्या साक्षीने, नितळ आकाशाखाली आणि पक्ष्यांच्या मधुर कूजनात, योगसाधनेचा हा कार्यक्रम म्हणजे तन-मन-आत्म्याच्या समतोल साधनेचा उत्सव ठरला.

कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक श्री. विशाल सावंत यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक लाभ समजावून सांगितले. त्यांनी स्वतः योगासनांचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर करून शिक्षकवर्गासह विद्यार्थ्यांमध्ये योगविषयी आस्था आणि प्रेरणा निर्माण केली.

शाळेतील शिक्षकांनीही उत्स्फूर्तपणे विविध योगासने व प्राणायाम इत्यादी प्रात्यक्षिक सादर केले. तसेच  विद्यार्थ्यांकडून ही शिस्तबद्ध पने योगासने करून घेतली गेली. सूर्यनमस्कार, ताडासन,वृक्षासन, भुजंगासन, त्रिकोणासन, सर्वांगासन, हलासन, चक्रासनशवासन व प्राणायाम यांचे अत्यंत सुरेख प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी सादर केली, ज्यातून त्यांच्या शरीर-मनातील ऊर्जा ओसंडून वाहताना दिसली.

 शाळेने राबवलेल्या या उपक्रमाचे संस्थेचे चेअरमन मा.श्री. सुशिलकुमार कासलीवाल, उपाध्यक्ष सुशील कासलीवाल, सचिव विजय चोपडा, प्रशासक प्रकाश गुप्ता ,सहसचिव प्रमिला ताई कासलीवाल,विश्वस्त रिखबचंद कासलीवाल, जुगलकिशोर अग्रवाल, महेंद्र चांदिवाल, आनंद कासलीवाल, दिलीप पारख तसेच प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.विशाल सावंत यांनी विद्यार्थ्यांच्या प्रदर्शनाचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments