Bay -team aavaj marathi
मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)
नांदगाव तालुक्यातील मल्हार वाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ. अश्विनी मुकुंदा खैरनार यांची बिनविरोध निवड झाली.ठरल्या नुसार आवर्तन पद्धतीने चित्रा मधुकर इघे यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने झालेल्या सरपंच सरपंचपदासाठी मंगळवारी दि.१७ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्य यांची विशेष सभा घेण्यात आली होती.
या सभेत सरपंचपदासाठी अश्विनी खैरनार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडळ अधिकारी सुवर्णा गोडे व सहाय्यक निवडणुक अधिकारी तलाठी सचिन मोरे यांनी अश्विनी खैरनार यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.
त्यांना ग्रामपंचायत अधिकारी आर. एम मगर, कर्मचारी कृष्णा बावणे यांचें सहाय्य लाभले..या विशेष सभेस उपसरपंच दिपक खैरनार, ग्रामपंचायत सदस्या सारिका जेजुरकर, चित्रा इघे, मीना गोविंद, सरला काकळीज, शोभा पिठे,सुनंदा झेंडे, ग्रामपंचायत सदस्य राहुल पवार आदी उपस्थित होते. या निवडीनंतर ढोल ताशांचा गजर व फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष साजरा करण्यात आला. नवनिर्वाचीत सरपंच अश्विनी खैरणार यांचे तालुक्याचे आ. सुहास कांदे यांच्या वतीने युवा नेते सागर हिरे बाजार समिती संचालक अमोल नावंदर तसेच बाजार समितीचे माजी सभापती सतीष बोरसे, अर्जुन ( बंडू ) पाटील यांनी सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी जि. प माजी सदस्य रमेश बोरसे, शिवाजीराव पाटील, संजय सानप ' संतोष गुप्ता, डॉ. वाय.पी. जाधव, बाजार समितीचे सचिव अमोल खैरनार, नानू कवडे यांनी अभिनंदन केले.
यावेळी दिपक कासलीवाल, गोकुळ खैरनार, बाळासाहेब गोराडे, संदीप खैरनार, ओमप्रकाश अग्रवाल, शामसुंदर धूत,अशोक पाटील, भय्या संगवे, आनंद शेट चोरडीया, समाधान भोसले, सुनील भवर, समता परिषदेच्या सौ.चंद्रकला बोरसे यांचेसह मल्हार वाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments