प्रभु श्रीरामचंद्र यांनी स्थापन केलेले नांदगाव तालुक्यातील शनी देवाचे साडेतीन शक्ति पीठांपैकी एक संपुर्ण शक्ती पीठ असलेल्या श्री क्षेत्र नस्तनपुर येथून बुधवार दि.१८ जुन रोजी नांदगाव नस्तनपुर ते पंढरपूर आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान झाले.
या दिंडी सोहळ्याचे चौथे वर्ष आहे, या प्रसंगी शेकडो भाविक तसेच श्री.शनी महाराज मंदिर समोर संस्थान चे विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री शनी देवाचे पुजन आणि महाआरती करून संस्थेचे जनरल सेक्रेटरी माजी आ. अनिलदादा आहेर यांचे शुभ हस्ते यावेळी रथ व पालखी चे पूजन करून दिंडी सोहळ्यासाठी प्रस्थान करणार्या भाविकांना विश्वस्त मंडळाच्या वतीने शुभेच्छा दिल्या नंतर दिंडी सोहळा रवाना झाला.
यावेळी संस्थान चे विश्वस्त उदय पवार विजय चोपडा.डॉक्टर शरद आहेर खासेराव सुर्वे, कांदळकर, कैलास गायकवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
0 Comments