कासलीवाल स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी उत्सव उत्साहात संपन्न....

 Bay -team aavaj marathi 

विजय जी चोपडा जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

 J.T. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल नांदगाव येथे शनिवारी दि. 5 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा केली होती. विठू माऊलीच्या अभंगावर ठेका धरत बाल वारक-यांनी दिंडी उत्सवात साजरी केली.

या निमित्त स्कूलचे प्राचार्य श्री.मणी चावला यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमा पुजनाने व आरतीने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांचा उत्साह अवर्णनीय होता.या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात तसेच 'ज्ञानोबा माऊलीचा' गजर करत दिंडी नांदगाव येथील संत सावता महाराज कंम्पाऊड या ठिकाणी संत सावता महाराज व विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नेण्यात आली.

तेथील विश्वस्त प्रशांत खैरनार यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व समजाविले. व विश्वस्तांनी विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप केला.

 तेथे बाल वारक-यानी समूह नृत्य, लेझीम नृत्य,गोल रिंगण, वारकरी पाऊली तसेच विद्यार्थ्यांनी 'माऊली माऊली' चा गजर करत,विठ्ठल नामाची शाळा भरवली,पंढरी पंढरी अभंग गात ,पाऊली खेळत आपला उत्साह द्विगुणीत केला.यावेळी स्कूलचे प्राचार्य श्री मणी चावला सर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रमुख सौ.सुवर्णा आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शिक्षकांनी मिळून केले होते.

सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन मा. श्री. सुनिलकुमारजी कासलीवाल तसेच संस्थेचे सेक्रेटरी विजय चोपडा,प्रमिलाताई कासलीवाल, सुशिलभाऊ कासलीवाल, जुगलकिशोरजी अग्रवाल, महेंद्र चांदीवाल ,रिखबचंद कासलीवाल, प्रकाश गुप्ता ,प्राचार्य मणी चावला सर,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आषाढी एकादशी निमित्ताने शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments