Bay- team aavaj marathi
विजय जी चोपडा जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)
सौ. कमलाबाई माणिकचंद कासलीवाल प्राथमिक विद्यालय, नांदगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त संतांच्या भक्तिपंथे चालत बाल वारकरी उत्साहाने विठ्ठल नामात तल्लीन झाले,सुंदर असे मनमोहक दृश्य बघायला मिळाले.
या पावन दिवशी शाळेतील शिक्षकांनी विठ्ठल भक्तीचा इतिहास व आषाढी एकादशीचे अध्यात्मिक महत्त्व सहज व सोप्या भाषेत समजावून सांगितले.विद्यार्थ्यांनी भक्तीपूर्ण वातावरणात गुंग होऊन माहिती समजून घेतली.
त्यानंतर शाळेच्या प्रांगणात भरवण्यात आलेल्या बाल वारकऱ्यांच्या रिंगण सोहळ्याने वातावरण भक्तिमय झाले. फेटे, टाळ, मृदुंगाच्या गजरात,"गजर विठ्ठलाचा.. जय जय रामकृष्णहरी..." असा घोष करत विद्यार्थी रिंगणामध्ये सहभागी झाले. रंगीबेरंगी पोशाख, टाळांच्या तालावर थिरकणारे पावले आणि भक्तिभावाने ओथंबलेली मनं — हे दृश्यच जणू पंढरपूरच्या वारीची अनुभूती देणारे होते.
शेवटी, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दिंडीने प्रदक्षिणा घालून या भक्तिमय कार्यक्रमाची सांगता झाली. या दिंडीने शाळा आणि परिसर भक्तिरसात न्हालं. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना प्रसाद म्हणून पौष्टिक आणि पारंपरिक राजगिरा लाडू वाटप करण्यात आले.
शाळेने राबवलेल्या या कार्यक्रमाचे संस्थेचे चेअरमन मा. श्री सुनीलकुमार कासलीवाल, उपाध्यक्ष सुशील कासलीवाल, सचिव विजय चोपडा, प्रशासक प्रकाश गुप्ता, सहसचिव प्रमिला कासलीवाल, विश्वस्त रीखबचंद कासलीवाल, जुगलकिशोर अग्रवाल, महेंद्र चांदीवाल, आनंद कासलीवाल, यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
मुख्याध्यापक विशाल सावंत सर व सिद्धार्थ जगताप, धन्वंतरी देवरे, निलोफर पठाण,अभिजीत थोरात,तुषार जेजुरकर, जयश्री पाटील, निशिगंधा शेंडगे, जयश्री कुमावत, पुनम खोंडे, मीना सुरळकर,शालिनी निकम, निकिता देशमुख या शिक्षकवृंदांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि भक्तिपरंपरेला साजेसा अशा पद्धतीने पार पडला. या उत्सवातून विद्यार्थ्यांना संस्कार, श्रद्धा व संस्कृतीचे सुंदर वळण लाभले.
पांडुरंग भक्तीचा धागा हातात घेऊन आज शाळेतील चिमुकल्यांनी वारकरी परंपरेचा वारसा आपल्या पावलांमधून अनुभवला, हेच या उपक्रमाचे यश!
0 Comments