मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबत जातेगाव च्या वारकरी दाम्पत्याला मिळाला महापूजेचा मान.

 Bay -team aavaj marathi 

आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या आज पहाटे २.३० वाजता देशातील सर्व वारकरी बांधवांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व सौ अमृता फडणवीस यांच्या हस्ते केल्या जाणाऱ्या महा पूजेसाठी वारकरी संप्रदायातील मानाचा असणारा बहुमान नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील वारकरी श्री. कैलास दामु उगले यांना मिळाला. हा बहुमान मिळालेल्या दांपत्यास महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने वर्षभर मोफत प्रवास सुविधा दिल्या जाते.

सविस्तर वृत्त असे की, नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील श्री कैलास उगले हे एक सर्वसामान्य शेतकरी असून ते गेल्या १२ वर्षांपासून सपत्नीक पंढरपूरची नियमित वारी करत आहेत. यावेळी आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी २० लाखांपेक्षा अधिक भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर नगरीत दाखल झालेले असताना, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील कैलास दामू उगले यांना यंदाच्या शासकीय महापूजेचा मान लाभला आहे. हे एक अत्यंत गौरवाचे आणि आध्यात्मिक महत्त्व असलेले क्षण आहे. कारण या पूजेमध्ये थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सहभागी होण्याची संधी उगले कुटुंबाला मिळाली आहे. याप्रसंगी त्यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

 शेतकरी असूनही वारकरी परंपरेला वाहून घेतलेल्या उगले दांपत्याने संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. ग्रामीण भागातील साधे जीवन जगत असतानाही, त्यांच्या निष्ठेने त्यांना विठुरायाच्या सान्निध्यात राज्यस्तरीय सन्मान उपलब्ध करून दिल्याने ही समाजासाठी प्रेरणादायी घटना आहे कैलास उगले हे नाशिक जिल्ह्यातील प्रथम वारकरी ठरले आहेत.


-----------------------------------------------------------------

पांडुरंगा वरील १२ वर्षाच्या निष्ठेचे फळ मिळाले - डॉ अमोल उगले 

शेतकरी असूनही वारकरी परंपरेचा अभिमान आमचे काका श्री कैलास दामु उगले आणि काकू सौ कल्पना उगले हे एक सर्वसामान्य शेतकरी असून गेल्या १२ वर्षांपासून पंढरपूरची नियमित वारी करत आहेत. त्यांची वारकरी संप्रदायाशी असलेली निष्ठा आणि भक्तिभाव यामुळे पांडुरंगानेच त्यांना वारकऱ्यांमध्ये मानाचे स्थान प्राप्त केले आहे. या श्रद्धेच्या आणि सेवाभावाच्या आधारेच यावर्षी त्यांची मानाच्या वारकऱ्यांमध्ये निवड करण्यात आली आहे. असे मत त्यांचे पुतणे डॉ अमोल उगले यांनी व्यक्त केले.























Post a Comment

0 Comments