मनरेगा आयुक्तांकडून विविध विकास कामांची केली पाहणी विकास कामे रखडली जाणार नाहीत याची दक्षता घेण्याचे दिले आदेश

 Bay- team aavaj marathi 

Dr.शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)

 महाराष्ट्राचे मनरेगा आयुक्त डॉ.भारत बास्टेवाड यांनी ब्राह्मणगाव ग्रामपंचायत कार्यालयास भेट देऊन मनरेगा अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेऊन पाहाणी केली. व विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. असे आश्वासन त्यांनी दिले. परंतु गावचे विकास कामे रखडली जाणार नाहीत याची दक्षता घेण्याचे त्यांनी आदेश दिले. 

सविस्तर वृत्त असे की, उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव चे सुपुत्र तथा महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचे आयुक्त डॉ. भारत बास्टेवाड यांनी येथील ग्रामपंचायत कार्यालयात भेट देऊन विकास कामांच्या मुद्द्द्यावर सविस्तर चर्चा केली. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच परमात्मा गरुडे यांनी त्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी येथील स्मशानभूमीतील शुशोभिकरणाची पाहणी केली व समाधान व्यक्त केले. 

यावेळी त्यांच्या समवेत राज्य समन्वयक अभय तिजारे, तांत्रिक सल्लागार दर्शन आंबीलदुके, जिल्हा एमआयएस समन्वयक शेखर विरुडकर, उमरखेड पं.स.चे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी संतोष पांडे, सरपंच परमात्मा गरुडे, ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश राठोड, उपसरपंच प्रियंका गोरे, माजी पंचायत समिती सदस्य नयन पुदलवाड, नागनाथ ढोले,पत्रकार निळकंठ धोबे, ग्रामपंचायत सदस्य शेख खदीर हनीफ, मोक्षधाम समितीचे अध्यक्ष गजानन कोंडरवार, रवी धबडगे, मुख्याध्यापक कैलास कोंडरवाड, विश्वंभर लंकलवाड, संतोष पेटेवाड, विठ्ठल गंधपवाड, बालाजी मार्लेर्वाड, गजानन मुक्कावार, जयशंकर राठोड, शैलेश त्रिवेदी, परमेश्वर गायकवाड, विजय जाधव, विशाल राठोड, अतुल भुसावार, शुभम पुरी, विशाल पाईकराव, रणजीत राठोड,  लिपिक यादव अक्कलवाड, रोजगार सेवक सूर्यभान हिंगाडे, ग्रा. प. कर्मचारी नरसिंग पल्लेवाड आणि गर
गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments