म.वि.प्र. संचलित स्व.शरद आण्णा आहेर जनता विद्यालय, मांडवड विद्यालयात "आषाढी एकादशी" निमित्ताने दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात विठुरायाच्या प्रतिमा पूजन, आरतीने करण्यात आली. उपस्थितांचे स्वागत करत विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.जी. थेटे यांनी महाराष्ट्राच्या जडणघडण मध्ये संतांचे मोठे योगदान आहे. आषाढी एकादशी निमित्ताने वारकरी संप्रदाय पंढरपूरला जात असताना विठुराया प्रति असलेली त्याची श्रद्धा, महाराष्ट्राची संस्कृती, विठुराया प्रति समर्पण भावना, शिस्तबद्ध दिंड्या याविषयी अभ्यासपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली.
त्यानंतर विठ्ठल_रुक्मिणी ची मूर्ती, ज्ञानेश्वरी ठेवलेली पालखी घेऊन विठ्ठलाच्या वेशभूषा मध्ये असलेली विद्यार्थिनी सिद्धी थेटे व रुक्मिणी वेशभूषा मध्ये असलेली शितल जाधव, यांच्या समवेत वारकरी वेशभूषा मध्ये आलेले विद्यार्थी गळ्यात तुळशीच्या माळा व कपाळावर अष्टगंध, पायजमा,डोक्यावर टोपी परिधान करून व हातामध्ये भागवत धर्माच्या ध्वज पताका घेऊन तर विद्यार्थिनी नऊवारी साडी परिधान करून व डोक्यावर तुळस घेऊन दिंडीमध्ये सहभागी झाले होते. गावातील मंडपेश्वर मंदिर येथे मृदुंगाच्या गजरात व विठ्ठल विठ्ठल जय हरी,ज्ञानोबा माऊली तुकारामाचा गजर करत दिंडी नेण्यात आली.
या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अभंग, भजन सादर करत भक्तिमय वातावरण निर्माण केले. सदर कार्यक्रमासाठी शालेय स्कूल कमिटी अध्यक्ष प्रशांत भाऊ आहेर,मांडवड गावाचे तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रसेन आबा आहेर, मविप्र सभासद बाबुरावतात्या आहेर, बाळासाहेब आहेर,गंगाराम थेटे, गंगाधर आहेर,रामराव भाऊ मोहिते, दौलतराव आहेर, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती डॉ.प्रवीण निकम, मांडवड सोसायटी मा.चेअरमन योगेश आहेर व शंकर मोहिते उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाला मविप्र नांदगाव तालुका संचालक इंजि. अमित भाऊ बोरसे(पाटील) यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे नियोजन क्रीडाशिक्षक संदीप आहेर, ज्येष्ठ शिक्षक कवडे एस. एस., परदेशी एच. टी.,सांस्कृतिक विभाग प्रमुख चव्हाण एम. के. यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारीयांनी परिश्रम घेतले व भक्तीपूर्ण वातावरणात कार्यक्रम यशस्वी पार पडला.
0 Comments