शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड चार लाखाच्या मुद्देमालासह नऊ जनावर गुन्हे दाखल

 Bay- team aavaj marathi 

Dr.शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)

नांदेड जिल्हयाच्या सिमेलगत असलेल्या यवतमाळ हद्दीत दराटी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या उमरखेड तालुक्यातील खरबी गावाच्या शेतात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून ५२ पत्ते जुगार अड्ड्यावर छापा टाकून ९ जणांविरोधात गुन्हे दाखल करून ४ लाख १७ हजार २२० रुपयाचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना रविवारी सायंकाळी दिनांक ६ जुलै रोजी घडली.

पोलिसांनी ताब्यात घेतलेले आरोपी नारायण बुमन्ना कनपिलवाड (५६) रा. मांडवी ता. किनवट जि. नांदेड, गणेश भिकू जाधव (३६) रा. आंबाडी ता.किनवट जि. नांदेड, महेंद्र नारायणराव गंदमवार (४७) रा. किनवट वेलमापुरा, प्रल्हाद लक्ष्मण शिंदे (४२) रा. दाभाडे नगर किनवट, असद खान मेहबुब खान (५६) रा. शिवाजी नगर, राम जयराम राठोड (५५) रा. मलकापूर ता, रंगराव हिरामण राठोड (५०) रा. बेंडीतांडा, मुकेश प्रभाकर जाधव (५०) रा. रामनगर वरील सर्व संशयित आरोपी नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील असून हे ५२ पत्ता जुगार खेळत असताना पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी मिळून आल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

यावेळी त्यांची अंगझडती तसेच सदर ठिकाण वरुन एकूण ४,१७,२२०/- रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला. वरील संशयितांच्या विरुध्द मजुका कलम १२ अ अन्वये गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई करीता पोलीस स्टेशन दराटी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

वरील कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड पोलीस निरीक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात स.पो.नि. धिरज बांडे, पो. उपनि शरद लोहकरे, पो.हवा.मुन्ना आडे, संतोष भोरगे,तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, पोशि सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, पोशि राजेश जाधव सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Post a Comment

0 Comments