गोरगरीब आदिवासी मुलांसाठी सरसावले राज्यभरातून मदतीचे हात नांदगाव तालुक्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

 Bay -team aavaj marathi 

सोमनाथ घोगांणे पत्रकार नांदगाव (नाशिक)

मराठी शाळा वाचवण्यासाठी, एकलव्य आदिवासी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लिंबी व राज्यभरातील शिक्षणप्रेमी मित्र परिवाराच्या वतीने एक हात मदतीचा राबविण्यात आला.या द्वारे फक्त २१ रुपये गरीब मुलांच्या शालेय साहित्य देण्यासाठी दान करा अशी विनंती करण्यात आली.संस्थेने सुमारे ५०० आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचं ध्येय ठेवले होते.याद्वारे विद्यार्थ्यांना वही,पेन,पेन्सिल,अंक लिपी, खोडरबर,शॉपनर इत्यादी साहित्य वाटप करण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जतपूरा तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथे योगेश थोरात साहेब (शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती नांदगाव) व संतोष भैरव सर केंद्रप्रमुख यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या आवारात फुलांचे रोपटे लावून करण्यात आली.

या उपक्रमाच्या माध्यमातून ही शाळा निवडण्याचे कारण म्हणजे पर्जन्य छायेच्या प्रदेशात खडकाळ भागात वसलेली ही छोटीशी वस्ती,उत्पन्नाची अपुरे साधने,गोर गरीब कुटुंबातील विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. या निमित्ताने आदिवासी गरीब मुलांच्या शिक्षणात खारीचा वाटा उचलण्याचा भाग्य लाभलं याचा नक्कीच आनंद आहे.आम्ही उपक्रमाच्या माध्यमातून समाजाकडून मदतीची रक्कम फक्त २१ रुपये एवढी ठेवली होती. आपले २१ रुपये सुद्धा कोणाच्यातरी आयुष्यात आनंद निर्माण करू हा यामागील हेतू होता. आज घडीला समाज परिवर्तनासाठी झटणारी खूप माणसं आहेत.त्यांच्यापर्यंत पोहोचलं तर नक्कीच परिवर्तन होण्यास वेळ लागणार नाही.आम्ही संस्थेच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरात काम करणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आमच्या आव्हानाला साद देत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत भविष्याचे स्वप्न रंगवणाऱ्या लेकरांना साथ देणारे मदतीचे हात राज्यभरातून पुढे आले. 

सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपत दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या गरीब मुलांना मदत करण्यासाठी दातृत्वाचे हात पुढे केले. गोरगरिबांच्या शिक्षणाचा शेवटचा आधार बनलेली मराठी शाळा वाचवण्यासाठी सुरू करण्यात आलेला हा उपक्रम अल्पावधीतच प्रसिद्धीस आला. आमच्या आव्हानाला व्यापारी,शेतकरी,शेतमजूर,तरुण तसेच प्रशासनात विविध पदावर सेवा बजावणाऱ्या मित्रांनी दिलेला प्रतिसाद.यामुळेच आज आपण ५०० विद्यार्थ्याना शालेय साहित्याच्या स्वरूपात मदत मिळत आहे.

ग्रामीण भागातील वाड्यावरस्त्यावर राहणारे लोकांच्या आयुष्यात दररोजच्या जगण्यामरण्याचा संघर्ष सुरू आहे.तरीही माणसं विना तक्रार आनंदाने जगण्याचा प्रयत्न करतात.त्यांच्या पाल्याच्या शैक्षणिक अडचणी सुद्धा कमी नाहीत.त्यांना छोटीशी मदत करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करू शकलो म्हणजे आपण धन्य झालो.लहान मुलांच्या शिक्षणाला गती देण्यासाठी आपल्याला हातभार लावता आला व या विद्यार्थ्यां- मध्ये साक्षात पांडुरंग शोधला.

या वेळी थोरात साहेबांनी आपले मनोगत व्यक्त करताना या उपक्रमाचे कौतुक केले.जशी आपल्या शाळेला मदतीसाठी राज्यभरातून मदतीचे हात पुढे आले.त्याच पद्धतीने आपण उच्च शिक्षण घेऊन आयुष्यात यशस्वी झाल्यानंतर भविष्यात गोर गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या हाती पेन देण्याचं कार्य करावे असा मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.साहेब पुढे म्हणाले ज्यांना विठ्ठलाच्या भेटीला जाता येत नाही.त्यांच्या भेटीला साक्षात विठ्ठल येत असतो.आपल्या प्रत्येक चांगल्या कामात पांडुरंग दडलेला आहे फक्त तो आपल्याला शोधता आला पाहिजे.

यावेळी उपस्थित संतोष भैरव सर,शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती विद्या पाटील मॅडम,सह शिक्षक अमोल आढळकर सर, बोरसे सर,प्रीती दरोडे मॅडम.शालेय समिती अध्यक्ष सुनील डोळे समितीचे सर्व सदस्य व प्रतिष्ठित गावकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments