Bay- team aavaj marathi
Dr.शिवचरण हिंगमिरे पत्रकार उमरखेड (यवतमाळ)
महाराष्ट्र शासनाने १ जुलै २४ पासून गायीच्या दुधाला ५ रु अनुदान मंजूर केले त्यात पुन्हा दोन रुपयांनी वाढ करून हीच अनुदान सात रुपये केले. या मध्ये म्हशीच्या दुधाला मात्र वगळण्यात आले . त्यामुळे म्हशीच्या पासून दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यावर अन्याय झाला असून शासनाने म्हशीच्या दुधाला सुद्धा अनुदान देणे गरजेचे असल्याची मागणी उमरखेड येथील दुग्ध उद्योजक संदीप भट्टड यांनी दूध उत्पादक संघाच्या झालेल्या ऑनलाइन बैठकीत मागणी केली.
यावेळी बोलताना राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भातील समशीतोष्ण वातावरणामुळे जर्सी किंवा एच एफ गायीच्या प्रजाती येथे तग धरत नसल्याने येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांना म्हशीच्या दुधाचा व्यवसाय करणे हाच एकमेव पर्याय आहे असे म्हटले.
याविषयास अनुसरून म्हशीच्या दुधापासून मिळणारे उत्पन्न गुंतवणुकीपेक्षा कमी असल्याने आणि चारा खाद्य महाग असल्याने परवडत नाही. परंतु केवळ शेतीला पूरक व्यवसाय म्हणून येथील दूध उत्पादक शेतकरी हे म्हशींचे संगोपन करून त्यावर आपला उदरनिर्वाह करीत असतात. विदर्भ व मराठवाड्यातील दूध उत्पादकामध्ये सकारात्मकता आणण्याकरिता म्हशीच्या दुधाला सुद्धा अनुदान देण्यात यावे तसेच गाईच्या दुधासाठी ज्या योजना आहेत त्या सर्व योजना म्हशी दुधासाठी देण्यात याव्या. अशी मागणी स्थानिक नमस्कार डेअरी चे चेअरमन तथा विदर्भ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज चे अध्यक्ष संदीप भट्टड व नमस्कार डेअरी चे संचालक निखिल भट्टड यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली.
याप्रसंगी आ.किसनराव वानखेडे, भाजपा जिल्हा समन्वयक नितिन भुतडा यांनी या विषयात लक्ष घालून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.राज्याचे कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित दूरस्राव्य परिषदेत संदीप नारायण दास भट्टड यांनी हा मुद्दा उपस्थित केला. बैठकीत सचिव रामा स्वामी आयुक्त मोहोळ साहेब महाराष्ट्रातील निमंत्रित सर्व दूध प्रकल्प उद्योजक उपस्थित होते.
0 Comments