Bay- team aavaj marathi
भरत पारख पत्रकार मनमाड {नाशिक}
आ. सुहास अण्णा कांदे यांनी मुंबई येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गिरणा नांदगाव पाणी योजना आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवन मनमाड पाणी योजना या दोन्ही पाणी पुरवठा योजना या वेळेत पूर्णत्वास याव्यात यासाठी अधिकारी व ठेकेदार यांच्या सोबत स्वतंत्र बैठक घेण्यात आल्या.
यावेळी नांदगाव शहराला शुद्ध व सातत्यपूर्ण पाणीपुरवठा करण्यासाठी गिरणा नांदगाव पाणी योजना राबवण्यात येत आहे. या वेळी ठेकेदारांनी माहिती दिली की, ही योजना साधारणपणे पुढील ६ महिन्यांत पूर्ण केली जाईल. आमदार सुहास कांदे यांनी यावेळी कामाच्या दर्जावर आणि वेळेच्या काटेकोर अंमलबजावणीवर विशेष भर देत, "नांदगाव करांना दर्जेदार पाणी देणे ही माझी सर्वोच्च प्राथमिकता आहे, कोणत्याही अडथळ्यामुळे नागरिकांचे हक्क डावलले जाणार नाहीत." असे ठामपणे सांगितले.
या आढावा बैठकीत तांत्रिक बाबी, निधी व्यवस्थापन, अंमलबजावणीची अडचणी, तसेच पुढील टप्प्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.या योजनांमुळे हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, दीर्घकाळ चालत आलेली पाण्याची समस्या कायमची दूर होणार आहे. यावेळी सर्व संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना कामात गती आणण्यासाठी आणि नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश बैठकीदरम्यान आ. सुहास आण्णा यांनी दिले. ही केवळ विकास योजना नाहीत, तर माझ्या मतदारसंघातील जनतेच्या आयुष्याचा भाग आहे. पाणी ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे आणि ही गरज पूर्ण करणे, हे माझे पहिले कर्तव्य आहे, असे म्हटले.
त्याचप्रमाणे मनमाड मनमाड पाणीपुरवठा योजना संबंधी संबंधित अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत नागरिकांच्या दीर्घकाळ च्या पाण्याच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सुरू असलेल्या योजनेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मनमाड शहराला कायमस्वरूपी व शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून राबवण्यात आलेली ही महत्वाकांक्षी योजना आता पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या योजनेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते लवकरच होणार असून आढावा बैठकीत उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी आणि नागरिकांना वेळेत पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी ठेकेदारांना स्पष्ट निर्देश देण्यात आले.
आमदार कांदे यांनी सांगितले की "मनमाड शहरातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवणे ही फक्त योजना नव्हे, तर ही माझी जबाबदारी आहे. नागरिकांनी अनेक वर्षे कष्ट उपसले आहेत, आता त्यांना "समाधानाचा क्षण मिळायला हवा." उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या कडक सूचना संबंधित ठेकेदारांना या वेळी देण्यात आल्या आहेत.या दोन्ही पाणी पुरवठा योजनांच्या बैठकीत उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी आपली जबाबदारीची जाणीव व्यक्त करत, काम वेळेत आणि योग्य दर्जाने पूर्ण करण्याचे ठोस आश्वासन दिले.वरील दोन्ही योजनेच्या प्रत्येक टप्प्याचा नियमित आढावा घेण्यात येणार असून, नागरिकांना वेळोवेळी माहिती पुरविण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
या बैठकीसाठी प्रसंगी सौ. अंजुमताई कांदे, युवासेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान, ठेकेदार श्री. अविनाश शिरसाठ, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट (पीएमसी) कचवे, तसेच नांदगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. शामकांत जाधव त्याचप्रमाणे मनमाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. शेषराव चौधरी, प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टमचे संचालक श्री. राजेंद्र सनेर, ईगल कंपनीचे संचालक श्री. विनय चूग, एम.जे.पी.चे श्री. सूर्यवंशी व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते
0 Comments