सर्पदंश झालेल्या शेतकऱ्याची चार दिवसांपासून मृत्यूशी झुंज रस्ता नसल्यामुळे उपचारास विलंब नागरिकांकडून खेद व्यक्त

 Bay- team aavaj marathi 

नांदगाव तालुक्यातील पिंपरी हवेली येथील शेतकरी वाल्मीक कचरु वाघ हे आपल्या शेतात एक जुलै रोजी दुपारी १२ वाजता काम करत असताना त्यांना क्रोबा या अती विषारी सापाने सर्प दंश केला. त्यांचे शेत असलेल्या ठिकाणी रस्ता नसल्याने सर्पदंश झाल्यानंतर त्यांच्यावर उपचारास विलंब झाल्याने त्यांची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. 

सविस्तर वृत्त असे की शेतकरी वाल्मीक वाघ यांच्या शेतात जाण्यासाठी साधी पायवाट देखील नसल्याने शेतकरी कचरु वाघ यांना सर्प दंश झाल्याचे लक्षात आले असता त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी साधारण एक किलो मीटर पर्यंत धावत सुटले.

त्यावेळी येथील शेतकरी अंबादास वाघ यांनी तत्परता दाखवत आपल्या चारचाकी वाहनाने शेतकरी वाल्मीक वाघ यांना नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. यावेळी ग्रामीण रुग्णालयात उपस्थित डॉक्टरांनी वाल्मीक वाघ हे साधारण एक किलो मीटर जोरात पळाल्याने त्यांच्या शरीरात विष पसरले असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथे खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. गेल्या चार दिवसांपासून शेतकरी वाल्मीक वाघ यांची परिस्थिती चिंताजनक असून ते मृत्यूशी झुंज देत आहे

वरील घटनेची येथील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत असून, सर्पदंश झालेले शेतकरी वाल्मीक वाघ यांच्यावर केवळ शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याकारणाने त्यांच्यावर वेळेत उपचार मिळाले नसल्याने वाल्मीक वाघ यांची परिस्थिती चिंताजनक आहे. प्रशासनाने तालुक्यात लक्ष घालून शेतकरी रस्त्याच्या समस्या सोडवावा अशी विनंती गावातील नागरिक करत आहे.

Post a Comment

0 Comments