नांदगाव च्या होरायझन ॲकॅडमीत दिंडी व रिंगण सोहळा उत्साहात.

 Bay -team aavaj marathi 

सिताराम पिंगळे पत्रकार मांडवड नांदगाव (नाशिक)

आषाढी एकादशी निमित्ताने मराठा विद्या प्रसारक समाजाचे नांदगाव येथील होरायझन ॲकॅडमी शाळेत दिंडी सोहळा तसेच रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक ह.भ.प रंगनाथ चव्हाण हे होते तसेच या वेळी संस्थेचे जेष्ठ सभासद रामनाथ गायकवाड, ह.भ.प.दत्तात्रय काकळीज, नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दर्शन आहेर, सुखदा आहेर, डॉ गणेश चव्हाण, तसेच शालेय प्राचार्या श्रीम.पुनम डी मढे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात विठुरायाची प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विठुरायांची आरती देखील करण्यात आली. विद्यार्थ्यांनी याप्रसंगी पूर्व प्राथमिक व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी भक्ती गीतांवर नृत्य सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील संतांची वेशभूषा व अभंग सादर केली. त्यात स्पंदन पाटील, शौर्य आहेर, आदिनाथ निकम ,सत्यम सोनवणे , निर्विघ्ना म्हस्के,स्वरूपा भामरे ,आदिनाथ चव्हाण, श्रीशा पवार, आदि विद्यार्थ्यांनी संतांची वेशभूषा सादर केली.तसेच इयत्ता पाचवी आणि सहावीतील विद्यार्थ्यांनी लेझीम सादर केले.

यानंतर कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे दिंडी व रिंगण सोहळा. यात विठ्ठल विठ्ठल जय हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम च्या जयघोषाने भव्य दिंडी व रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा सादर करत भगवी पताका,टाळ, मृदुंगाच्या तालावर पावली घेतली. परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते शेकडो विद्यार्थी या सोहळ्यात विठ्ठल नामाच्या गजरात दंग झाले होते. विद्यार्थी व शिक्षक, शिक्षिका यांनी फुगडीचा आनंद घेतला.

 या कार्यक्रमास मराठा विद्या प्रसारक समाजाचे नांदगाव तालुका संचालक इंजि. अमित भाऊ बोरसे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या तसेच शालेय प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षिका शरयू आहेर यांनी केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शालेय शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments