भालूर येथील जनता विद्यालय "तैलचित्राचे अनावरण व दप्तर वितरण" सोहळा उत्साहात संपन्न

 Bay- team aavaj marathi 

सिताराम पिंगळे पत्रकार मांडवड नांदगाव (नाशिक)

नांदगाव तालुक्यातील भालुर येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे, अभिनव बालविकास मंदिर, जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे दि.१ जुलै  रोजी तैलचित्र अनावरण आणि दप्तर वितरण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या विशेष कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते.

सविस्तर वृत्त असे की कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली. यानंतर संस्थेचे नांदगाव तालुका संचालक इंजिनीअरिंग अमित भाऊ बोरसे -पाटील आणि व सौ.वंदनाताई कापसे व कुमारी नुपूर कापसे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि विद्येची देवता सरस्वती माता यांचे भव्य तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. त्यांनी आपल्या कार्याने शाळेच्या व विद्यार्थी घडविण्याच्या कार्यात मोठे योगदान दिले असल्याची गौरवोद्गार उपस्थितांनी काढले.

यानंतर विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप करण्यात आले. सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्याचे वितरण झाले. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक सुलभ होणार आहे.

त्याचप्रमाणे मा. संचालक इंजि. अमित भाऊ बोरसे-पाटील यांनी मराठा विद्या प्रसारक समाज संस्था कशा रीतीने कर्मवीरांच्या त्यागातून व सहाय्यातून उभी झाली व आज महाराष्ट्रातील अग्रगण्य बनली हे सांगितले . तसेच कुमारी नुपूर कापसे यांनी देखील त्यांच्या वडिलांचे म्हणजेच बाळासाहेब कापसे यांचे जूने शिक्षणाविषयीचे अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले.तसेच कापसे फाउंडेशन मध्ये अपंग गरजू व होतकरू व्यक्तींना कशाप्रकारे रोजगार मिळवून देऊन विशेष असे सहाय्य केले जाते हे देखील समजले.

या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष कचरु आहेर, धनाजी जठार व सर्व सदस्य, सर्व ग्रामस्थ आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. योगिता आहीरराव यांनी केले व आभार प्रदर्शन श्रीमती तासकर यांनी केले, पालक विद्यार्थी व ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद या सोहळ्यासाठी लाभला.

Post a Comment

0 Comments