नांदगाव शहरातील रस्ता कॉंक्रिटीकरण व भुयारी गटात कामाचे सौ.अंजुमताई कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न.

 Bay- team aavaj marathi 

भरत पारख पत्रकार नांदगाव (नाशिक) 

नांदगाव शहरातील नगरपरिषद हद्दीत लक्ष्मी ज्वेलर्सचे श्री मेडिकल पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण व भुयारी पाईप गटार तसेच सोन्या मारुती चौक ते गांधी चौक पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण व भुयारी पाईप गटार या नागरिकांच्या मुलभूत सुविधांच्या विकास कामांचे सोमवार दि.३० रोजी सौ.अंजुम ताई सुहास कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. 

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरात विविध रस्ता काँक्रिटीकरण व भुयारी गटार करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून यामुळे स्वच्छ व सुंदर तसेच आदर्श शहराची प्रतीमा निर्माण होणार आहे.

वरील विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेश कवडे आनंद कासलीवाल नंदू पाटील सुरेश कासार मुकुंद खरोटे, नरेंद्र खरोटे, प्रमोद बाविस्कर, राजेंद्र कासार अमोल शेठ नावंदर, यज्ञेश कलंत्री, सागर हिरे, गुलाब भाबड, प्रकाश शिंदे,  मुजू शेख, सिद्धेश खरोटे, जय खरोटे लालू दर्डा, अय्याज शेख, मनीष बाविस्कर, सुमित कांदे, शिवसेना महिला आघाडीच्या उज्वलाताई खाडे, नांदगाव शहर प्रमुख रोहिणीताई मोरे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments