Bay- team aavaj marathi
भरत पारख पत्रकार नांदगाव (नाशिक)
आ. सुहास अण्णा कांदे यांनी नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना महापुरुषांच्या पुतळ्यांना संरक्षण देण्याबाबत ची निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,, मतदार संघातील नांदगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा गांधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदी महापुरुषांच्या पुतळ्यांना संरक्षण नसल्यामुळे पुतळ्यांची विटंबना होऊन समाजात जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सदर पुतळ्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी निवेदनाद्वारे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केले आहे.
सोमवार दिनांक 30 जून रोजी पहाटे एका मनोरुग्ण महिला द्वारे अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या सुशोभीकरणाचे लाईट तोडण्यात आले असून यामुळे स्मारकाचे विटंबना व नुकसान झालेले आहे. यामुळे सामाजिक भावना दुखावल्या असून धनगर समाजात तीव्र नाराजी निर्माण झालेली आहे. सदर घटनेत महिला वेडसर असल्याने समाजाने सामंजस्याची भूमिका भूमिका घेतली असली, तरी यापुढे असे गैरकृत्य होऊ नये. याची काळजी म्हणून यास संरक्षण मिळावे म्हणून आमदार सुहास अण्णा कांदे यांचे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष साईनाथ गिडगे माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, चंद्रशेखर कवडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बंडू पाटील, युवासेनेचे तालुकाध्यक्ष सागर हिरे, त्र्यंबक शेरमाळे, राजेश शिंदे, बिरू शिंदे, शरद आयनोर,सुनील नेमणार, शुभम शिंदे, दीपक बनगर, निवृत्ती शिंदे, श्री पारखे, डॉ. गणेश चव्हाण, विकी सोर, भिका खटके, चांगु खेमनार, जय तांबे, संतोष सोर, महिंद्र गायकवाड, तानसेन जगताप उपस्थित होते
0 Comments