राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त 'गृह संपर्क अभियानास प्रारंभ

Bay- team aavaj marathi 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आणि नागरिकत्वाचे धडे देण्यासाठी नांदगाव शहरात 'गृह संपर्क अभियान' उत्साहात सुरू करण्यात आले आहे. १ फेब्रुवारीपासून सुरू झालेले हे अभियान २१ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून, या माध्यमातून संघाचे स्वयंसेवक शहरातील प्रत्येक घराचा उंबरठा ओलांडून संवाद साधणार आहेत.

या अभियानांतर्गत स्वयंसेवक संघाच्या कार्याची माहिती देण्यासोबतच, संघाचे विविध सेवा प्रकल्प आणि सामाजिक आयामांची माहिती नागरिकांना देत आहेत. प्रामुख्याने पाच महत्त्वाच्या सूत्रावर (पंच परिवर्तन) या गृह संवादात भर दिला जात आहे. या अभियानाचे सामाजिक समरसता उच्च-नीच असा भेदभाव नसलेला समाज निर्माण करणे आणि द्वेष पसरवणाऱ्या प्रवृत्तींना रोखणे,. पर्यावरण संरक्षण: पर्यावरणाबाबत जागृती करून प्रत्यक्ष कृतीसाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे, कुटुंब प्रबोधन: 'मी ते आम्ही' या प्रवासासाठी कुटुंबातील सदस्यांनी एकत्र वेळ घालवण्याचे महत्त्व पटवून देणे.स्वबोध स्वदेशी जीवनशैलीचा अंगीकार करून 'आत्मनिर्भर भारत' घडवण्यासाठी प्रयत्न करणे, नागरिक शिष्टाचार: संविधानाचे पालन, नियमांचे रक्षण आणि शिस्त पाळून जबाबदार नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडणे.शताब्दी निमित्त गृह संवादात मुख्य पाच सूत्रावर भर देण्यात आला आहे.

हे अभियान संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, समाजाशी असलेली नाळ अधिक घट्ट करण्यासाठी हे अभियान राबवले जात आहे. नांदगाव मधील स्वयंसेवकांच्या या उपक्रमाला सर्व स्तरातील नागरिकांकडून ही सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, यानिमित्ताने घराघरात राष्ट्रभक्ती आणि सामाजिक जबाबदारीचे विचार पोहोचत आहेत.

Post a Comment

0 Comments