Bay- team aavaj marathi
राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी मराठवाड्यात भयंकर घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरुन सोडले असून, नांदेड जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक अत्यंत क्रूर घटना समोर आली असून, सत्तेच्या लालसेपोटी एका जन्मदात्या पित्यानेच आपल्या सात वर्षांच्या मुलीचा जीव घेतल्याचा आरोप होत आहे. मुखेड तालुक्यातील या नराधम बापाने तेलंगणा राज्यात नेऊन आपल्या पोटच्या गोळ्याला कालव्यात फेकून दिले. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत तिसरे अपत्य अडथळा ठरू नये, यासाठी हे भयानक कृत्य केल्याची चर्चा सध्या परिसरात सुरू आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,साहित्य खरेदीच्या बहाण्याने मुलीला नेले मृत्यूच्या दारात मुखेड तालुक्यातील केरूर गावाचा रहिवासी असलेला आरोपी पांडुरंग कोंडामंगले याचे बाऱ्हाळी येथे सलून चे दुकान आहे. त्याला एकूण तीन मुले होती. तीन दिवसांपूर्वी दुकानासाठी आणि घरासाठी साहित्य आणायचे आहे, असे पत्नीला सांगून तो आपली सात वर्षांची मुलगी प्राची हिला सोबत घेऊन घराबाहेर पडला होता. मात्र, त्याचे मनसुबे वेगळेच होते आणि तो तिला थेट राज्याच्या सीमेपलीकडे घेऊन गेला.
तेलंगणा हद्दीतील बोधन रोडवरील कट्टापल्ली भागात पोहोचल्यावर या निर्दयी बापाने चिमुकल्या प्राची नावाच्या मुलीला जिवंतपणीच तेथील एका कॅनॉल मध्ये फेकून दिले. यानंतर काहीही न घडल्यासारखा तो एकटाच घरी परतला. दरम्यान, स्थानिक लोकांना कॅनॉल मध्ये मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. तेलंगणा पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवली असता, धागेदोरे नांदेड पर्यंत पोहोचले आणि ३० जानेवारी रोजी त्यांनी मुदखेड मध्ये येऊन आरोपीला बेड्या ठोकल्या.
यात तिसरे अपत्य ठरत होते निवडणुकीतील विजयाचा अडसर होत असल्याने तपास चक्रात उघड झाल्याने पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून हत्येच्या नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे. मात्र, गावात आणि तालुक्यात सुरू असलेल्या चर्चेनुसार, पांडुरंग कोंडामंगले याला आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाची निवडणूक लढवायची होती. तो सरपंच पदाचा उमेदवार म्हणून तयारी करत होता, परंतु निवडणूक आयोगाच्या नियमानुसार दोनपेक्षा जास्त अपत्ये असणाऱ्यांना निवडणूक लढवता येत नाही.
पांडुरंग यास तीन अपत्ये असल्याने त्याचे सरपंच होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नव्हते, त्यामुळे तिसरे अपत्य असलेला हा अडथळा दूर करण्यासाठी त्याने आपल्या मुलीचा बळी दिला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. काही लोकांच्या मते आर्थिक अडचणीतून हे कृत्य घडले असावे, परंतु राजकीय महत्त्वाकांक्षेचा कोन अधिक गडद मानला जात आहे. पोलीस आता या दोन्ही शक्यता पडताळून पाहत असून, या घटनेने संपूर्ण नांदेड जिल्हा सुन्न झाला असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


0 Comments