यवतमाळ जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकी सबंधाने उमरखेड पोलीस विभागाने बंदोबस्त करण्यासाठी सर्व ताकतीनिशी सज्ज झाला असून पोलीस अधिक्षक डॉ. कुमार चिंता, अपर पोलीस अधिक्षक आशोक थोरात, तसेच उप. विभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात एकुण ४४ बुथवर संवेदनशिल भागासह मतदान प्रत्यक्ष केंद्रावर बंदोबस्तासाठी एकूण १२ पोलीस अधिकारी ,१२२ पोलीस अंमलदार, एस. आर.पी.एफ च्या ३ सेक्शन सह आर.सी.पी. चे १ पथक, ८२ होमगार्ड सैनिक या व्यतिरिक्त अतिरीक्त बंदोबस्तासाठी इतर १ अधिकारी, ११ अंमलदार, ३० होमगार्ड सैनिक मतदान केंद्राच्या १०० मी परीसरात लावण्यात आले आहेत.
मतदानाचे दिवशी, मतदान केंद्रावर किंवा मतदान केंद्रापासून १०० मी. चे आत तसेच केंद्राच्या आसपास कोणीही अनूचीत प्रकार केल्यास कायदेशीर कडक कारवाई करण्याचा पोलीस विभागाचा इशारा पोलिस विभागाने यावेळी दिला.
मतदानाचे दिवशी, मतदान केंद्रावर किंवा मतदान केंद्रापासून १०० मी. चे आत व आसपास कोणी असामाजिक तत्व किंवा इतर कोणीही अनुचीत प्रकार, वादविवाद,जातियतेड निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास किंवा वाद निर्माण होईल, असे स्टेट्स ठेवल्यास त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई कली जाईल. असा कडक इशारा ठाणेदार शंकर पांचाळ यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.
0 Comments